ठाणे (प्रतिनिधी) - दिवाळी आली की प्रत्येक घरात आनंद, उत्साह आणि प्रकाशाची लकेर पसरते. लहान मुलं नवीन कपडे, फराळाचा सुगंध, आकाशात झगमगणारे फटाके सगळं वातावरण जणू स्वर्गीय वाटतं. पण या प्रकाशोत्सवाच्या क्षणी काहींच्या आयुष्यात मात्र काळोख दाटून येतो. कारण, फटाक्यांचा एक क्षणिक आनंद त्यांच्या डोळ्यांचा प्रकाश कायमचा हिरावून घेतो त्यामुळे दिवाळीत डोळ्यांची विशेष काळजी घेण्याचे आवाहन नेत्र तज्ज्ञांनी केलं आहे प्रत्येक वर्षी दिवाळीनंतर देशभरातील नेत्ररुग्णालयांत शेकडो रुग्ण गंभीर नेत्रदुखापतीसह दाखल होतात. सुतळी बॉम्ब फुटून ठिणगी उडाली, रॉकेटचा धूर डोळ्यांत शिरला, फुलबाजीचा कण चेहऱ्यावर पडला आणि एक क्षणात आयुष्य बदलून जातं. “थोडं काही नाही झालं” असं वाटलेलं ते दुखणं, काही वेळातच कॉर्निया जळणं, नेत्रपटल फाटणं, दृष्टी धूसर होणं अशा गंभीर रूपात बदलतं
डोळ्यांना झालेली इजा नेहमी बाहेरून दिसत नाही. काही वेळा आतल्या स्तरांवर (रेटिना किंवा कॉर्निया) जखम होते आणि त्याचं परिणाम काही दिवसांनी दिसू लागतात. तज्ज्ञ सांगतात — फटाक्यांमधील रसायनं आणि धूर डोळ्यांच्या आर्द्रतेवर आणि रक्तवाहिन्यांवर दुष्परिणाम करतात. यामुळे फॉरेन बॉडी इन आय, कॉर्नियल बर्न, रेटिनल ब्लीडिंग, इनफेक्शन अशी स्थिती निर्माण होते असल्याची माहिती सिव्हिल रुग्णायाच्या नेत्रतज्ज्ञ डॉ. शुभांगी अंबाडेकर यांनी केलं आहे. फटाक्यांमधून निघणारी उष्णता 1800° फॅरेनहाइटपर्यंत पोहोचते म्हणजे साधारण लोखंड वितळेल इतकी तापमानाची तीव्रता! अशा ठिणगीचा छोटासा कणसुद्धा डोळ्यात पडल्यास नेत्रपटलाला कायमचं नुकसान पोहोचवू शकतो. फुलबाजी, सुतळी बॉम्ब, रॉकेट, फाउंटन, अगदी साधी फुलबाजी’सुद्धा असाच धोका निर्माण करू शकतो.
फटाक्यांमधील धूर आणि रासायनिक घटक डोळ्यांसाठी अत्यंत घातक आहेत. ठिणगी उडाल्यावर लगेच थंड पाण्याने डोळे धुवा, पण स्वतःहून कोणतंही औषध किंवा मलम लावू नका. त्वरित नेत्ररुग्णालयात जा. उशीर म्हणजे धोका.” डॉ. शुभांगी अंबाडेकर (नेत्र तज्ज्ञ सिव्हिल रुग्णालय ठाणे) यांनी माहिती देताना सांगितले. फटाक्यांची ठिणगी उडाल्यानंतर डोळ्यांवर हात लावू नका. डोळे चोळू नका. मलम, आयड्रॉप किंवा अँटीबायोटिक स्वतःहून वापरू नका. रॉकेट किंवा सुतळी बॉम्ब फोडताना चेहऱ्याजवळ झुकू नका. गॉगल्स किंवा सुरक्षात्मक चष्मा वापरा. वाऱ्याच्या दिशेने फटाके फोडू नका. थंड पाण्याची बाटली जवळ ठेवा. जखम झाल्यास त्वरित थंड पाण्याने धुवा आणि डॉक्टरांकडे जा.
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.