loader
Breaking News
Breaking News
Foto

माजी अर्थमंत्री आणि ज्येष्ठ भाजपा नेते महादेवराव शिवणकर यांचे निधन

गोंदिया - माजी मंत्री आणि ज्येष्ठ भाजप नेते, गोंदिया जिल्ह्याचे शिल्पकार महादेवराव सुखाजी शिवणकर यांचे सोमवारी महाराष्ट्रातील गोंदिया जिल्ह्यात दीर्घ आजाराने निधन झाले, अशी माहिती कुटुंबातील सूत्रांनी दिली. शिवणकर (85) यांनी पहाटे आमगाव येथील त्यांच्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला, असे त्यांचे पुत्र विजय शिवणकर यांनी सांगितले. ते आमगाव मतदारसंघातून पाच वेळा आमदार होते आणि त्यांनी लोकसभेत चिमूर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते. या ज्येष्ठ नेत्याने भाजप शेतकरी सेलचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणूनही काम केले. शिवणकर यांनी 26 जानेवारी 1999 रोजी भंडारा जिल्ह्याचे विभाजन आणि नवीन गोंदिया जिल्ह्याची निर्मिती जाहीर केली होती.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

1990 च्या दशकात महाराष्ट्रातील मनोहर जोशी सरकारमध्ये राज्याचे सिंचन आणि अर्थमंत्री म्हणून यांनी काम पाहिले. शिवणकर यांच्या पश्चात त्यांचे पुत्र विजय आणि संजय शिवणकर आणि एक मुलगी असा परिवार आहे. मंगळवारी आमगाव येथील साखरीतला घाटावर अंत्यसंस्कार केले जातील आणि सकाळी 10 वाजता शिवणकर यांच्या निवासस्थानापासून अंत्ययात्रा सुरू होईल.

टाईम्स स्पेशल

भाजपाचे ज्येष्ठ नेते, राज्याचे माजी अर्थमंत्री महादेवराव शिवणकर यांच्या निधनाचे वृत्त वेदनादायी आहे. पूर्व विदर्भात भाजपाच्या उभारणीत त्यांनी दिलेले योगदान अतिशय मोलाचे होते. विधानसभा, लोकसभेत त्यांनी सामान्यांचे प्रश्न मांडण्याचे काम सातत्याने केले. शेती आणि सिंचन हे त्यांच्या जिव्हाळ्याचे विषय होते. त्या क्षेत्रात त्यांनी केलेले काम कायम स्मरणात राहील. एक कर्मठ नेता म्हणून त्यांची ओळख होती. नक्षलग्रस्त भागाचा कायापालट व्हावा आणि तेथे विकास व्हावा, ही त्यांची तळमळ असायची, असं म्हणत त्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg