loader
Breaking News
Breaking News
Foto

संगमेश्वरच्या बाजारात दिवाळीची चमक

संगमेश्वर (प्रतिनिधी) - दिवाळी म्हटली की, कपड्यांची खरेदी ही आलीच. गरीब असो वा श्रीमंत दिवाळीत कपड्यांच्या खरेदीसाठी सर्वजण कुटुंबासह बाहेर पडताना दिसत आहेत. तरुणाईही नवनवीन आधुनिक फॅशनच्या शोधात जिल्ह्यातील कापड दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत. दिवाळीच्या हंगामामध्ये जिल्ह्यामध्ये काही रुपयांची उलाढाल कपडे व्यवसायातून होत आहे. दिवाळीत कपडे खरेदीमध्ये महिला, लहान मुले व तरुणांचा उत्साह मोठ्या प्रमाणात असतो. याचाच फायदा घेत संगमेश्वर बाजारपेठेतील अनेक कपड्यांची दुकाने आधुनिक कपड्यांनी सजलेली आहेत. कपड्यांचे नवनवीन शेकडो प्रकार बाजारात आलेले आहेत. चांगल्या दर्जाची ड्रेस मटेरियल, तसेच तयार कपडेही बाजारात आल्याने ग्राहकांची दुकानांमध्ये गर्दी उसळलेली आहे. तरुणांमध्ये अनेक फॅशनचे कपडे बाजारात आल्याने खासकरून तरुणाईंची दुकानांमध्ये अधिक प्रमाणात गर्दी दिसत आहे. दिवाळीमध्ये पहिल्या दिवशी, तसेच भाऊबीज, धनत्रयोदशीसाठी वेगवेगळ्या प्रकारचे कपडे लागत असल्याने हे कपडे खरेदी करण्यासाठी अनेक प्रकारही उपलब्ध झालेले आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

प्रत्येक दुकानात एका कुटुंबातील पाच-सहा जण खरेदी करत असल्याने ५ ते १० हजार रुपयांपर्यंत ग्राहकाचे बिल होत आहे. संगमेश्वर तालुक्यात या दिवाळी हंगामात मोठी उलाढाल या दुकानांमध्ये होत असते. स्थानिक दुकानदारांबरोबरच ब्रॅण्डेड कंपन्याच्या शोरूममध्येही चांगली वर्दळ दिसत आहे. तयार कपड्यांचे किमान दर १ हजारापासून सुरू होते. इतर व्यवसायात मंदीचे वातावरण असले, तरी कपडे गरजेचे असल्याने त्यामध्ये मात्र ग्राहकांचा कल अधिक प्रमाणात दिसत आहे. दिवाळीची खरेदी म्हणजे महिलांसाठी पर्वणीच असते. त्यामुळे महिलांचा दुकानांमध्ये वावर वाढलेला आहे. महिलांसाठी आकर्षक प्रकार बाजारात आले आहेत.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg