loader
Breaking News
Breaking News
Foto

म्हसळा शहरात साकारणार शिवसृष्टी ; खासदार सुनील तटकरे यांचा हस्ते भूमिपूजनाचे आयोजन

म्हसळा - खासदार सुनील तटकरे यांचा महत्वकांक्षी प्रकल्प असलेल्या शिवसृष्टी उभारणे कामाचे भूमिपूजन त्यांचाच हस्ते दिनांक १९ ऑक्टोबर २०२५ रोजी संध्याकाळी चार वाजता म्हसळा तहसिल कार्यालय जुन्या इमारतीचे ठिकाणी होणार आहे.म्हसळा शहराच्या लौकीकात आणखी मानाचा तुरा खोवण्यासाठी खासदार सुनील तटकरे यांच्या प्रयत्नांतून महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा व शिवरायांच्या जीवनावरील ऐतिहासिक घटनांचे म्युनरल्सद्वारे शिवसूष्टी उभारण्यात येत आहे.या प्रकल्पात छत्रपती शिवाजी महाराज यांचा ब्रांझ धातूचा घोड्यावर अश्वारुढ पुतळा, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आयुष्यावरील ठळक घडामोडी व महाराजांच्या सेनापतींचे चित्रशिल्प भित्तीचित्रे,साकारण्यात येणार आहेत.आयोजीत कार्यक्रमात म्हसळा तालुक्यातील शिवभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन म्हसळा नगर पंचायत मार्फत करण्यात आले आहे.भूमिपूजन कार्यक्रमप्रसंगी प्रथम म्हसळा एस.टी.स्थानक ते जुने तहसील कार्यालय पर्यंत भव्य मिरवणुक निघणार आहे.त्यानंतर ग्राम दैवत धावीरदेव मंदिर पटांगणात विराट सभा होणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg