loader
Breaking News
Breaking News
Foto

स्थानिक स्वराज्य निवडणुका पूर्ण ताकदीने लढवणार; खेड मध्ये रिपाइ निर्धार- सुशांत भाई सकपाळ

खेड : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले रत्नागिरी जिल्हा तर्फे डॉ बाबासाहेब आंबेडकर भवन येथे जिल्हा पदाधिकारी तालुका व शहर पदाधिकाऱ्यांची विशेष बैठक पार पडली. या बैठकीचे अध्यक्षस्थान रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष प्रीतमजी रुके यांनी भूषविले, तर कोकण विभागीय अध्यक्षयांनी प्रकाशजी मोरे मार्गदर्शन केले. या बैठकीत प्रमुख उपस्थिती राज्य कार्यकारणी दादा साहेब मर्चेडे यांची प्रमुख उपस्थिती होती. नवनियुक्त खेड तालुका अध्यक्ष गौतम तांबे व सरचिटणीस जितेंद्र तांबे यांची नियुक्ती कारण्यात आली या बैठकिला उपस्थित जिल्हा कार्यकारिणीचे पदाधिकारी तालुका पदाधिकारी व प्रमुख मान्यवर यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. बैठकीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठीची पूर्वतयारी, जिल्ह्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषद व नगरपंचायत संघटनात्मक बांधणीचा आढावा घेण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी प्रत्येक तालुक्यात नव्या तरुण युवा वर्गाला मोठ्या प्रमाणावर संधी देण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले. तसेच “गाव तिथे शाखा” अभियान जिल्ह्यात राबविण्याबाबत चर्चाही झाली. बैठकीच्या अखेरीस रिपब्लिकन पक्षाच्या वतीने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पूर्ण ताकदीने लढवण्याचा निर्धार केला. तसेच महायुती ने रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार निवडून अनावेत खेड मध्ये महायुती म्हूणन निवडणुका लढावी लोटे पंचायत समिती, बहिरीवली गण रिपब्लिकन पक्षाला सोडावा अशी मागणी करण्यात आली. या प्रसंगी जिल्हा, जिल्हा सरचिटणीस आदेश मर्चेडे, विजू आपा कदम, गौतम तांबे, जिल्हा संपर्क प्रमुख जिल्हा पर्यावरण अध्यक्ष सुरेंद्र तांबे, चिपळूण तालुका अध्यक्ष प्रशांतजी मोहिते, सरचिटणीस उमेश सकपाळ, दापोली तालुका अध्यक्ष राहुल जाधव, खेड युवक अध्यक्ष विकास दुत्रे, किरण गमरे, गुहागर युवक अध्यक्ष विजय आजोळकर, रत्नागिरी तालुका अध्यक्ष विलास कांबळे, युवक जिल्हा संपर्क प्रमुख गणेश शिर्के, खेड शहर अध्यक्ष दीपेंद्र जाधव, मिलिंद तांबे, संतोष कापसे, चंद्रमणी रुके आदी तालुका यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg