loader
Breaking News
Breaking News
Foto

शासनाने केली दिव्यांग व्यक्ती यांची दिवाळी गोड

खेड (प्रतिनिधी)- महाराष्ट्रातील दिव्यांग व्यक्ती यांच्या साठी असणारी संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजने अंतर्गत च्या दिव्यांग लाभार्थ्यांना मिळणाऱ्या अर्थसहाय्यात वाढ करण्या बाबत लोक प्रतिनिधी तसेच विविध दिव्यांग व्यक्ती संघटना, स्वयंसेवी संस्था यांच्या माध्यमातून शासनाकडे वारंवार दिव्यांग पेन्शन वाढ व दिव्यांग व्यक्तीसाठी आवश्यक असणाऱ्या विविध मागण्यांकरिता महाराष्ट्रात दिव्यांग व्यक्ती यांची मोठ्या प्रमाणात विविध आंदोलने होत आहेत या होणाऱ्या आंदोलनाचा शासनाने विचार करून सन 2025/26 च्या पावसाळी अधिवेशनामध्ये शासनातर्फे संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील पात्र दिव्यांग लाभार्थ्यांचे अर्थसाह्य रुपये 1500 वरून रुपये 2500 इतके करण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

दिव्यांग लाभार्थ्यांना या अर्थसाह्याचे वितरण डी.बी.टी पोर्टलद्वारे थेट लाभार्थ्यांच्या आधार संलग्न खात्या मध्येजमा करण्यात येत आहे. ऑक्टोबर 2025 पासून ही वाढ करण्यात येत आहे. महाराष्ट्रातील दिव्यांग व्यक्ती व दिव्यांग सामाजिक संघटना यांच्या दिव्यांग पेन्शन वाढ संदर्भातील मागणीकडे लक्ष देऊन काही अंशी थोड्या फार प्रमाणात मानधनामध्ये वाढ करून शासनाने दिव्यांग व्यक्तींची दिवाळी गोड व्हावी या साठी प्रयत्न केले आहेत. परंतु दिव्यांग व्यक्तीच्या पेन्शन वाढी संदर्भात व अन्य मूळ मागण्या आहेत त्या जोपर्यंत पूर्ण होणार नाहीत तो पर्यंत महाराष्ट्रातील विविध दिव्यांग संघटना, दिव्यांग व्यक्ती, सामाजिक संघटना यांची आंदोलने या पुढे देखील सुरूच रहातील शासनाने पुन्हा एकदा दिव्यांगाच्या विविध मागण्याचा विचार करून त्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील रहावे असे आव्हाहन दिव्यांग युवा क्रीडा प्रतिष्ठान रत्नागिरी या सामाजिक संस्थेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत सावंत यांनी केले आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg