loader
Breaking News
Breaking News
Foto

धामणी येथील निखिल देवरुखकर याने साकारली प्रतापगड किल्ल्याची प्रतिकृती

संगमेश्वर (प्रतिनिधी) - दिवाळीत भरभरून वाहत असतो तो आनंद, उत्साह आणि जल्लोष. आकाशकंदील, रांगोळी, पणत्यांनी घर न् घर आणि मनेही उजळून निघतात. दिवाळी आली की कपडे, फटाके, आकाशकंदील खरेदी करायची लगबग सुरू होते. तर बहुतांश ठिकाणी लहान मुलांची किल्ला बनवायची तयारी असते. थोडक्यात काय तर आपल्या इतिहासातील अनेक सुवर्णक्षण, अनेक मोहिमा, आनंदाचे दुःखाचे क्षण, पराभव- विजय, पराक्रम, आक्रमण यांचे हे किल्ले साक्षीदार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

गावाकडे प्रामुख्याने दगड, माती, शेण, चिकट धान्याचे पीठ अशा गोष्टी एकत्र करून एखाद्या किल्ल्याची प्रतिकृती तयार केली जाते. गावात काही जण हे किल्ला बांधणी करतात. तर काही साहित्य आणण्याचे काम करतात. पुढे मग किल्ला बांधणी झाली की, गेरू चुना वापरून किल्ल्याची रंगरंगोटी केली जाते. गुंजा, करडई अशा धान्यांनी नक्षीकाम केल्या जाते. मग किल्ल्यावर ध्वज लावले जातात. मूर्ती ठेवल्या जातात. झेंडूच्या झाडाचे तोरण लावले जाते. संध्याकाळी दिवे लावून किल्ल्यावर रोषणाई केली जाते. संगमेश्वर तालुक्यातील धामणी सोनारवाडी येथील निखिल देवरुखकर याने यंदा प्रतापगड किल्ला तयार करून सर्वांच लक्ष वेधून घेत आहे. गेले आठ दिवस तो मेहनत घेत होता.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg