loader
Breaking News
Breaking News
Foto

शिरगाव डॅममध्ये मगरीचे वन विभागाच्या पथकाकडून यशस्वी रेस्क्यू

खेड (दिलीप देवळेकर) — खेड तालुक्यातील मौजे शिरगाव येथील धरण परिसरात एक दुर्मीळ आणि धक्कादायक घटना घडली. पावसाळ्यात धरणाच्या आऊटलेटमधून पाण्यासोबत एक मगर घसरत खाली स्टॉप ओव्हर भागात आली होती. अचानक पाण्याच्या प्रवाहात वाहून गेलेली ही मगर पुन्हा वर म्हणजेच मूळ धरणाच्या पाण्यात परत जाऊ शकत नव्हती. स्थानिकांना ही गोष्ट निदर्शनास आली असता त्यांनी तत्काळ या घटनेची माहिती वन विभागाला दिली. या घटनेची माहिती मिळताच खेड-दापोली वन विभागाच्या रेस्क्यू टीमने घटनास्थळी धाव घेतली. परिस्थितीचा अंदाज घेत टीमने काळजीपूर्वक आणि शास्त्रीय पद्धतीने मगरीला सुरक्षितरीत्या पिंजऱ्यात पकडण्यात यश मिळवले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

रेस्क्यू झाल्यानंतर मगरीची प्राथमिक तपासणी करण्यात आली असता ती पूर्णपणे सुस्थितीत असल्याचे आढळले. यानंतर वन विभागाने ती मगर तिच्या मूळ नैसर्गिक अधिवासात म्हणजे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरक्षितपणे सोडून दिली. या संपूर्ण मोहिमेत दापोली वनपरिक्षेत्र अधिकारी प्रकाश पाटील तसेच रेस्क्यू टीमच्या सदस्यांनी दाखविलेल्या तत्परतेचे आणि दक्षतेचे स्थानिकांकडून कौतुक करण्यात येत आहे. या घटनेमुळे धरण परिसरातील नागरिकांनीही सुटकेचा निश्वास टाकला आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg