केळंबे-लांजा (सिराज नेवरेकर) - लांजा तालुक्यामधील वाघ्रट ग्रामपंचायतीने गावातील दारूबंदीचा उठाव केला आणि १५ ऑगस्ट रोजी गावच्या ग्रामसभेत दारूबंदीचा गावक-यांनी एकजूटने ठराव करुन यापुढे गावात दारु आढळून आल्यास कारवाई करण्याचा निर्णय ही घेण्यात आला. आता कोंडगे ग्रामपंचायतीने २९/८/२५ रोजी ग्रामसभेत दारूबंदीचा ठराव करून दारु बंदीची मोहीम हाती घेतली आहे. तालुक्यातील इतर ग्रामपंचायतीने आदर्श घेण्यासारखा हा निर्णय आहे. पोलीस, राज्य उत्पादन शुल्क अधिकारी यांना दारु बंदी करणे शक्य झाले नाही. ते काम गावचे नागरीक, महीला यांनी करुन दाखवले या ऐतिहासिक निर्णयाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. लांजा तालुक्यातील अनेक ग्रामपंचायती महात्मा गांधी तंटामुक्ती पुरस्काराने सन्मानित आहेत. सन्मानित होऊनही काही ग्रामपंचायती हद्दीमध्ये दारु धंदे आजही सुरू असल्याचेही नागरिकांनी तशा तक्रारी दाखल केल्या असल्याचे बोलले जात आहे.
परंतु दारूबंदी बाबत संबंधित यंत्रणेकडून तशी ठोस कारवाई होताना दिसुन येत नसल्याची नाराजी असुन नागरिकांनी स्वतःहून पुढाकार घेत ग्रामसभेत एकमुखी ठराव करून गावातून दारू हद्दपार करून गावातील कुटुंबियांचे उध्वस्त होणारे संसार वाचविण्याचा निर्णय घेतला आहे. याला अपवाद वाघ्रट-वाडीलिंबू ग्रुप ग्रामपंचायत आणि कोंडये ग्रामपंचायत ठरली आहे. दारू बंदीचा निर्णय घेणार्या वाघ्रट-वाडीलिंबू ग्रुप ग्रामपंचायतीची दखल तालुका तसेच जिल्हा प्रशासनाने घेतली आहे. या ग्रामपंचायतींचा आदर्श घेऊन तालुक्यातील इतर ग्रामपंचायतीनी दारु बंदीची मोहीम हाती घेण्याची गरज असल्याचे सुजाण नागरिकांमधून बोलले जात आहे. संबंधित प्रशासनाकडूनही तितकीच साथ मिळणे आवश्यक असल्याचे बोलले जात आहे. गावातील दारु धंद्यामुळे अनेक कुटुंबांचे संसार उध्वस्त होत आहेत. तरुण पीढी व्यसनाच्या आहारी जात आहेत. दारु पिऊन जीव गमवावा लागत आहे. गावातील इत्यादी अनेक उदाहरणे डोळ्यासमोर असताना गावाच्या सर्वागिण विकासाच्या दृष्टिकोनातून दारु बंदीसाठी पाऊल उचलणे गावाच्या हितावह ठरणारे आहे. वाघ्रट वाडीलींबू ग्रामपंचायत आणि कोंडगे ग्रामपंचायतीने घेतलेला निर्णय तालुक्यासाठी आदर्शवत असून या निर्णयाचे सर्वत्र स्वागत करण्यात येत आहे.
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.