loader
Breaking News
Breaking News
Foto

देवरुख ग्रामदेवता श्री सोळजाई देवी मंदिरात दशावतार रांगोळी ठरतेय लक्षवेधी

संगमेश्वर (प्रतिनिधी) - दिवाळी निमित्ताने देवरुखची ग्रामदेवता श्री देवी सोळजाई मंदिरात रेखाटण्यात आलेली भव्य दिव्य अशी दशावतार रांगोळी लक्षवेधी ठरली आहे. हनुमान प्रासादिक बालमित्र समाज खालची आळी येथील रांगोळी कलाकारांनी हा वारसा बरीच वर्ष जपला आहे. सध्या महाष्ट्रात गाजत असलेला दशावतार चित्रपटातील कलाकारांनी साकारलेल्या भूमिका रांगोळीच्या माध्यमातुन देवरुख येथे मंदिरात रेखाटल्या आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

छत्रपती शिवाजी महाराजांची सर्वात छोटी व कमी वेळात रांगोळी साकारुन विश्वविक्रम करणारा व मुंबई विद्यापिठात रांगोळीसाठी सुवर्णपदक मिळवलेला कलाकार विलास रहाटे याने या रांगोळीसाठी पुढाकार घेतला व 6X10 अशी दशावताराची भव्य दिव्य रांगोळी रेखाटताना मंगेश नलावडे, संदिप पवार, शिवम नलावडे आणि सार्थक नलावडे यांनीही या रांगोळीसाठी योगदान दिले. या सर्व कलाकारांनी साकारलेली हि दशावतार रांगोळी लक्षवेधी ठरली आहे. मंदिरात येणार्‍या भाविकांनी कलाकारांच्या कलेला दाद दिली आहे. आठ दहा तास खर्च करुन व १५ किलो रांगोळी वापरून दशावताराची कलाकृती या कलाकारांनी साकारली आहे.

टाइम्स स्पेशल

खालची आळी येथील हनुमान प्रासादिक बालमित्र समाजने कायमच सामाजिक बांधिलकी जपली आहे. दिवाळी निमित्ताने युवती व महिलांनी मंदिर परिसराची स्वच्छता करुन मनमोहक रांगोळ्या रेखाटल्या. सोळजाई देवस्थानच्या प्रत्येक उपक्रमात हनुमान प्रासादिक बालमित्र समाज सहभागी होत असतो. येथील रहिवाशी एकजूट राखून आहेत. विविध कार्यक्रमातून आपली कला सादर करुन कायमच शहरवासियांची मने जिंकली आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg