loader
Breaking News
Breaking News
Foto

सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाला फिजिशियन डॉक्टर मिळाले!

सावंतवाडी (प्रतिनिधी) - जनतेच्या आरोग्य प्रश्नी सावंतवाडीकरांचे एक यशस्वी सामाजिक पाऊल पडले आहे. सामाजिक कार्यकर्ते अ‍ॅड. अनिल निरवडेकर यांच्या पुढाकाराला यश आले असून, युवा नेते विशाल परब आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या सहकार्यातून सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाला अखेर फिजिशियन डॉक्टर मिळाले आहेत. पहिल्यांदाच सावंतवाडीत आरोग्य पर्वाचा नवा अध्याय रचला गेला आहे. सावंतवाडीकर जनतेने आंदोलनाचा मार्ग न निवडता, जनतेच्या मदतीने जनतेसाठी आरोग्याच्या प्रश्नाशी लढण्याचा निर्णय घेतला आहे. अ‍ॅड. अनिल निरवडेकर यांच्या पुढाकाराला भाजपा युवा नेते विशाल परब आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी साथ दिली, आणि सर्वांसमोर सावंतवाडीकरांनी आरोग्य सेवेचा नवा आदर्श उभा केला. सिंधुदुर्ग जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी पत्र देत डॉक्टर शंतनू तेंडुलकर यांची फिजिशियन म्हणून तात्पुरती नेमणूक केली असल्याचे जाहीर केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

गेले काही दिवस फिजिशियन नसल्यामुळे सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय धगधगत होते. एका बाजूला डॉक्टर आणि कर्मचारी अतिरिक्त जबाबदारीचा ताण घेऊन काम करत होते, तर दुसरीकडे गोरगरीब जनतेला योग्य उपचार मिळत नसल्याने त्यांच्या भावना संतप्त होत्या. रुग्णांना योग्य उपचार मिळण्यासाठी रुग्णालयात एका फिजिशियन डॉक्टरची नितांत गरज होती, ज्यामुळे उपलब्ध वैद्यकीय सामग्रीचा वापर होऊन सर्जरीसह अनेक आजारांवर उपचार शक्य झाले असते. मात्र, सध्या शासनाकडून या नेमणुकीसाठी आर्थिक तरतूद होणारी नव्हती, त्यामुळे वैयक्तिक रित्या मानधन देण्याची जबाबदारी कोणीतरी स्वीकारणे आवश्यक होते. यावर तोडगा म्हणून अ‍ॅड. अनिल निरवडेकर यांनी सावंतवाडीकर जनतेच्या माध्यमातून निधी उभारत फिजिशियन आणि आवश्यक नर्सेसच्या मानधनाची जबाबदारी स्वीकारण्याची संकल्पना मांडली. त्यांनी सावंतवाडीतील विविध संस्था व दानशूर व्यक्तींना आवाहन केले.

टाईम्स स्पेशल

त्यांच्या या आर्थिक स्व-सहयोगाच्या पुढाकाराचे भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी कौतुक केले. रवींद्र चव्हाण आणि युवा नेतृत्व विशाल परब यांनी यासाठी सहयोग दिला, ज्यामुळे फिजिशियन तसेच मदतीला लागणार्‍या नर्सेस यांचे एक वर्षभराचे मानधन उभारणे शक्य झाले. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी सावंतवाडीतील फिजिशियन डॉक्टर शंतनु तेंडुलकर यांना सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात नेमणुकीबाबत पत्र दिले. विशेष म्हणजे, डॉक्टर शंतनू तेंडुलकर यांनी हे मानधनापेक्षा सावंतवाडीकर जनतेची आजची गरज म्हणून ही जबाबदारी स्वीकारत असल्याचे सांगितले आहे. केवळ विरोधाची भूमिका न घेता आणि टीका न करता स्वतःच्या प्रयत्नातून तोडगा काढण्याच्या सावंतवाडीकरांच्या या भूमिकेचे सर्वत्र कौतुक होत आहे. सामाजिक कार्यकर्ते अ‍ॅड. अनिल निरवडेकर, दानशूर युवा नेतृत्व विशाल परब आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण या सावंतवाडीकर भूमिपुत्रांच्या संकल्पनेतून सुरू झालेली मी सावंतवाडीकर ही आरोग्यसेवेची चळवळ खरोखरच जनतेच्या हिताची आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg