loader
Breaking News
Breaking News
Foto

शिवसेनेअंतर्गत उमेदवारीसाठी अनेक स्पर्धक, बंडखोरीचा धोका

रत्नागिरी (टाइम्स डेस्क नेटवर्क)- रत्नागिरी जिल्ह्यात होऊ घातलेल्या आगामी नगरपरिषद, नगरपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणूकीसाठी अनेक इच्छूक उमेदवार पक्षाची डोकेदुखी ठरणार आहे, अशी शक्यता राजकिय सूत्रांकडून वर्तविण्यात येत आहे. इच्छूकांची संख्या मोठी आहे, त्यामुळे जोरदार रस्सीखेच होणार हे आता निश्‍चित आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

निवडणूकीसाठी माजी नगरसेवक-नगरसेविका, पंचायत समिती व जिल्हा परिषद माजी सदस्य हे पुन्हा उमेदवारीसाठी इच्छूक असल्याचे समजते. त्याचवेळी नव्याने इच्छूक असलेल्या व ज्यांना अद्याप संधी मिळालेली नाही, अशा शिवसैनिकांनी उमेदवारीसाठी प्रयत्न सुरु केले आहेत. रत्नागिरीच्या दौर्‍यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले असता, उमेदवारीबाबत अंतिम निर्णय शिवसेनेचे प्रमुख एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे. तरीही जिल्ह्यातील नेत्यांची शिफारस महत्वपूर्ण ठरणार आहे.

टाइम्स स्पेशल

भारतीय जनता पार्टीने स्थानिक जिल्हा पातळीवर सर्वाधिकार जिल्हाध्यक्षांना दिले आहेत, तसेच भारतीय जनता पार्टीला किमान ५०टक्के जागा अपेक्षित असल्याने युती अंतर्गत अजून निर्णय प्रक्रिया लांबलेली असल्याचे समजते. नगराध्यक्ष पदाचा उमेदवार निवडताना सभापती पदाच्या जागांबाबतही आत्तापासूनच अटीशर्ती एकमेकांना घातल्या जाणार आहेत. ५ वर्ष लोकप्रतिनीधी म्हणून काम करण्याची संधी कोणी गमाऊ इच्छित नाही. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात युतीअंतर्गत स्पर्धा सुरु आहे. त्याचवेळी ज्या जागांवर शिवसेनेचा दावा आहे, त्यातील काही जागा मित्रपक्ष भाजपला हव्या आहेत. यामुळे युतीमध्ये पेच निर्माण झाला आहे. अजून मित्रपक्ष भाजपने निवडणूक प्रक्रियेबाबत पाऊल उचलले नाही. त्यामुळे आता दिवाळी नंतर मोठी राजकिय खलबते सुरु होतील, असे राजकिय समिक्षकांचे म्हणणे आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg