loader
Breaking News
Breaking News
Foto

मडुरा व्ही.एन. नाबर स्कूलमध्ये पर्यावरणपूरक दिवाळी उत्सव

बांदा (प्रतिनिधी) - व्ही. एन. नाबर मेमोरियल इंग्लिश मीडियम स्कूल, मडुरा येथे दिवाळी सणाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक पद्धतीने आकाशकंदील तयार करून सण साजरा केला. शाळेच्या प्रांगणात रंगीबेरंगी रांगोळ्या काढून दिव्यांनी सुंदर सजावट करण्यात आली होती. या कार्यक्रमात शिक्षकांनी विद्यार्थ्यांना दिवाळी सणाचे सांस्कृतिक आणि सामाजिक महत्त्व समजावून सांगितले. तसेच विद्यार्थ्यांनी स्वतःहून शुभेच्छा पत्रे तयार करून ती शाळा व्यवस्थापन समिती सदस्यांना पोस्टाद्वारे पाठवली. या माध्यमातून विद्यार्थ्यांना पत्र व्यवहार आणि त्याचा प्रवास समजावण्यात आला. कार्यक्रमानिमित्त शाळा व्यवस्थापन समिती सदस्य भाऊ वळंजू आणि शशी पित्रे यांनी सर्वांना उटणे वाटप केले. प्रसंगी सदस्य सुरेश गावडे, मुख्याध्यापिका निती साळगावकर, तसेच सहशिक्षिका वेलांकनी रोड्रीस, मयुरी कासार, स्वरा राठवड व हर्षदा तळवणेकर उपस्थित होत्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg