loader
Breaking News
Breaking News
Foto

मणेरी धनगरवाडी येथे घरावर वीज पडून लाखोंचे नुकसान

दोडामार्ग (प्रतिनिधी) - दोडामार्ग तालुक्यातील अनेक गावात दिवाळी सणात परतीच्या पावसाचे धुमशान सुरू आहे. सोमवारी रात्री ढगाच्या गडगडाटासह वीजांचा लखलखाट करत दाखल झालेल्या परतीच्या पावसाने झोडपून काढले. मणेरी धनगरवाडी येथील विठ्ठल शाम गावडे यांच्या घरावर वीज पडून ती भिंतीतून आरपार जाऊन भिंतिना तडे जाऊन संपूर्ण वीज उपकरणे तसेच वायर तुटून जळून जवळपास लाखो रुपये नुकसान झाले. यामध्ये पतीपत्नी थोडक्यात बचावली. या बाबत महसूल विभाग यांना कळविण्यात आले. तसेच गावातील सामाजिक कार्यकर्ते शिवसेना युवा प्रमुख भगवान गवस यांनी भेट देऊन पाहणी केली. महसूल विभाग यांनी पंचनामा करून तातडीने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली जात आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg