रत्नागिरी - महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्यावतीने व सेंट्रल रेल्वे इन्स्टिटयूट दादर यांच्या सहयोगाने आयोजित केलेल्या ५९ व्या ज्युनियर राज्य अजिंक्यपद कॅरम स्पर्धेत २१ वर्षाच्या मुलींच्या एकेरीच्या अंतिम सामन्यात रत्नागिरीच्या आकांक्षा कदमने तीन सेटपर्यंत रंगलेल्या लढतीत सिंधुदुर्गच्या दीक्षा चव्हाणवर १६-१५, ५-१८ व २१-४ असा निसटता विजय मिळवून बाजी मारली. आंतरराष्ट्रीय कॅरमपटू आकांक्षा हि आपल्या अनुभवाच्या जोरावर दीक्षा चव्हाणवर वरचढ ठरली. उपांत्य फेरीत आकांक्षा कदम हिने रिची माचीवले मुंबई हिचा २१-०० व २१-०० असा सरळ दोन सेट मध्ये प्रराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. १८ वर्षाखालील मुलांच्या अंतिम सामन्यात रत्नागिरीचा ओम पारकरवर पुण्याच्या आयुष गरुडने बाजी मारली. त्याने २१-११, १२-२ असा एकतर्फी विजय संपादन केला. ओम पारकर याने उपांत्य फेरीच्या सामन्यात मुंबई उपनगरच्या मनवार अब्बासवर ५-१८, २१-०० व १७-०४ असा विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला.
राज्य कॅरम असोसिएशनचे उपाध्यक्ष यतिन ठाकूर, मानद सचिव अरुण केदार, सह सचिव केतन चिखले, मुंबई डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशनचे कार्याध्यक्ष धनंजय पवार व खजिनदार संजय देसाई यांच्या हस्ते विजेत्यांना चषक व प्रमाणपत्र देण्यात आले. रत्नागिरीच्या आकांक्षा कदम व ओम पारकर या दोन्ही खेळाडूंची १ नोव्हेंबर २०२५ पासून ग्वोलीयर, मध्यप्रदेश येथे होणार्या ५० व्या सब जुनियर राष्ट्रीय अजिंक्यपद कॅरम स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघात निवड झाली आहे. त्याचे रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशन व रत्नगिरी जिल्हा कॅरम खेळाडू तर्फे अभिनंदन व स्पर्धेसाठी शुभेच्छा.
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.