loader
Breaking News
Breaking News
Foto

हेमकांत गोयजी यांना जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

रायगड (प्रतिनिधी) - रायगड जिल्हा परिषद खामदे शाळेतील शिक्षक हेमकांत गोयजी यांना नुकताच रायगड जिल्हा परिषद यांच्या मार्फत महाराष्ट्र शासनाचा जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे व रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते अलिबाग येथे एका समारंभात प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमास जिल्हा परिषदेच्या मुख्याधिकारी नेहा भोसले, शिक्षणाधिकारी ललिता दहितुल्ले, उपशिक्षणाधिकारी संतोष शेडगे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. २० वर्षांची प्रेरणादायी शैक्षणिक वाटचाल हेमकांत गोयजी यांनी पूर्ण केली. या शैक्षणिक कारकीर्दीचा आरंभ २००५ पासून रा.जि.प. शाळा उसरोली येथून सुरू केला. या सेवा काळात त्यांनी कार्यरत असताना त्यांनी विद्यार्थ्यांसाठी विविध शैक्षणिक उपक्रम राबवले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

विद्यार्थी गुणवत्ता वाढवण्यासाठी विविध उपक्रम, शिष्यवृत्ती सराव वर्ग, गृहभेटी देवून या भागातील मुलांचा शोध घेऊन शाळेत दाखल करण्याचे कार्य त्यांनी प्रभावीपणे केले. मजगाव, महालोर व आगरदांडा शाळेत लोकसहभागातून लाखो रूपयांचा निधी गोळा करून शाळेचा भौतिक विकास केला. हेमकांत गोयजी यांनी शैक्षणिक कार्याबरोबर सामाजिक व सांस्कृतिक कार्यात उल्लेखनीय कर्तृत्व गाजविले. त्यांनी राज्यस्तरावर राज्यस्तर तज्ञ म्हणून काम करून शिक्षकांना प्रशिक्षण दिले. तसेच महाराष्ट्र शासनातर्फे प्रसिद्ध करण्यात येणार्‍या कृतिपुस्तिकेमध्ये लेखन केल आहे. विद्यार्थ्यांना शिकताना येणारे अडचणी लक्षात घेवून त्यांनी शैक्षणिक कृति संशोधन सुद्धा केला आहे. प्रयोगशील शिक्षक म्हणून २०१६ मध्ये तत्कालीन शिक्षण सचिव नंदकुमार यांनी त्यांना टीचर ट्रान्सफॉर्मर पुरस्कार देवून गौरविण्यात आले होते.

टाईम्स स्पेशल

त्यांच्या शैक्षणिक कामगिरीचा विचार करून रायगड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातर्फे सादर करण्यात आलेल्या प्रस्तावाला विभागीय आयुक्त यांनी मंजूरी देवून हेमकांत गोयजी यांना जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार २०२५ शिक्कामोर्तब केले. या अष्टपैलू शिक्षकाच्या समग्र कामगिरीचा विचार करून रायगड जिल्हा परिषदेने जिल्हा आदर्श पुरस्कार देवून त्यांचा गौरव केला. या पुरस्कार कार्यक्रमा प्रसंगी महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे, आमदार महेंद्र दळवी, मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, उप मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे, गटविकास अधिकारी राजेंद्र खताळ, गटशिक्षणाधिकारी सुनिल गवळी आदींसह केंद्रातील सर्व शिक्षकांनी हेमकांत गोयजी यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg