संगलट (खेड) (प्रतिनिधी) - रत्नागिरी जिल्ह्यात रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे होणाऱ्या अपघातांची मालिका सुरूच असून, असाच एक गंभीर अपघात चिपळूण तालुक्यातील दहिवली खुर्दजवळ घडला आहे. गुहागर ते रत्नागिरी या मार्गावर धावणाऱ्या एसटी बसच्या चालक आणि वाहकाच्या हलगर्जीपणामुळे बसमधील एक महिला प्रवासी रस्त्यावर पडून गंभीर जखमी झाली आहे. या प्रकरणी चिपळूण पोलिसांनी तातडीने एसटी बसचे चालक आणि वाहक अशा दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना दहिवली बद्रुक, शिवडेवाडी, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी येथे घडली. या अपघातात प्रियांका विनोद कुंभार (रा. दहिवली खुर्द, ता. चिपळूण) या महिला प्रवासी जखमी झाल्या आहेत. याबाबत जखमी महिलेसोबत प्रवास करणाऱ्या सविता सुभाष करंजेकर (वय ३९, व्यवसाय मजुरी, रा. दहिवली खुर्द) यांनी सावर्डे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
गुहागर बस डेपोचे चालक नितीन भाऊराव सावळे आणि वाहक चांद नजीर शेख यांच्या हलगर्जीपणामुळे हा अपघात झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. फिर्यादी आणि जखमी प्रियांका कुंभार या आंबाफाटा स्टॉप, दहिवली खुर्द येथून गुहागर ते रत्नागिरी जाणारी एम.एच. २० बी.एल. १६८२ क्रमांकाची एसटी बस पकडून सावर्डे येथे प्रवास करत होत्या. प्रवासादरम्यान, असलेल्या वाहकाने आपत्कालीन दरवाजा बंद आहे की नाही, याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. त्याचवेळी चालक नितीन सावळे याने रस्त्याच्या परिस्थितीकडे लक्ष न देता, अत्यंत हयगयीने आणि बेदरकारपणे एसटी बस वेगाने खड्डे असलेल्या रस्त्यावरून चालवली. परिणामी, बस रोडवरील एका मोठ्या खड्ड्यामध्ये आदळली आणि धक्क्याने ड्रायव्हरच्या मागील बाजूचा आपत्कालीन दरवाजा अचानक उघडला गेला. याच उघडलेल्या दरवाजातून प्रवासी प्रियांका कुंभार या रस्त्यावर पडल्या. या अपघातामुळे त्यांच्या डोक्याला आणि शरीराच्या इतर भागांवर किरकोळ तसेच गंभीर स्वरूपाच्या जखमा झाल्या आहेत. या घटनेची नोंद सावर्डे पोलीस ठाण्यात १९ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी करण्यात आली असून, पोलिसांनी भारतीय दंड संहिता कायद्याच्या कलम २८१, १२५(अ), १२५(ब) आणि १८४ अंतर्गत गु.आर. क्र. १०२/२०२५ नुसार गुन्हा दाखल केला आहे. रस्त्यावरील खड्डे आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात झाल्याने प्रवाशांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला.
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.