loader
Breaking News
Breaking News
Foto

शिवसेना शहरप्रमुख संदीप चव्हाण यांचे सामाजिक कार्य; प्लास्टिक मुक्तीसाठी केले जुट बॅग चे वाटप

दापोली (प्रतिनिधी) - शिवसेनेला राजकारणापेक्षा सामाजिक कामात अधिक रस असतो आणि त्यामुळेच ऐंशी टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण हे ब्रिद घेऊन शिवसेना संघटनेची वाटचाल अगदी स्थापनेपासूनच सुरू आहे. अशाच प्रकारचे सामाजिक काम शिवसेनेचे दापोली शहर प्रमुख संदिप चव्हाण यांनी विविध प्रकारच्या सामाजिक कामांव्दारे प्रत्यक्षपणे सुरू ठेवले आहे. या त्यांच्या सामाजिक कामाचे शहरवासीयांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

दापोली शहरातील विविध भागातील महत्त्वाच्या मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले होते. दापोली हे तालुक्याचे ठिकाण असल्यामुळे या मार्गावर केवळ शहरातील नागरिकच या रस्त्याचा उपयोग करतात असे नाही तर तालुक्यातील येथे येणार्‍या सर्वच लोकांना या मार्गाचा उपयोग होत होता. मात्र तरी देखील सत्ताधारी लक्ष देत नसल्याने अखेर शिवसेना शहरप्रमुख आणि नगरसेवक असलेल्या संदिप चव्हाण यांनी आपल्या खिशाला पदरमोड करत स्व खर्चाने जनहितासाठी म्हणून रस्त्यात पडलेले खड्डे बुजवून वाहतूक सुरळीत केली. या त्यांच्या सामाजिक कामाचा त्यांनी शहरात कुठेही नामफलक लावून प्रसिध्दिचा गाजावाजा केला नाही. त्यांनी स्वतः रस्त्यावर उभे राहून खड्डे बुजवून घेतले या त्यांच्या सामाजिक कामाचे शहरवासियांनी कौतुक तर केलेच शिवाय समाधान देखील व्यक्त केले. शहरात प्लास्टिक कच-यामुळे निर्माण होणा-या पर्यावरणाच्या समस्या निवारणासाठी त्यांनी दिवाळीनिमित्त स्वच्छ सुंदर दापोली शहरातील पर्यावरणाच्या रक्षणासाठी जूट बॅगचे वाटप करून पर्यावरणाचा संदेश दिला. संदिप यांच्या सामाजिक कामाचे शहरातील रहिवाशांसोबतच तालुक्यातील लोकांकडून कौतुक होत आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg