loader
Breaking News
Breaking News
Foto

आता बोला! निवडणूक आयोगाच्या कारभाराचा सत्ताधारी शिवसेनेला फटका

रत्नागिरी - मतचोरी आणि बोगस मतदानाच्या आरोपामुळे निवडणूक आयोग वादाच्या भोवर्‍यात सापडलेला असतानाच निवडणूक आयोगाच्या कारभाराचा फटका सत्ताधारी शिवसेनेलाही बसला आहे. रत्नागिरी नगर परिषद निवडणुकीत नगरसेवक पदासाठी शिंदे गटाच्या इच्छुक असलेल्या उमेदवाराचेच नाव मतदारयादीतून वगळले गेले असल्याची चर्चा सुरू आहे. २०२१ मध्ये रत्नागिरी नगर परिषदेचा कार्यकाळ संपल्यानंतर गेली ४ वर्ष अनेक इच्छुक उमेदवार निवडणुकीची तयारी करत होते. अखेर ऑक्टोबर महिन्यात नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदांची आरक्षण सोडत काढण्यात आली. आरक्षण जाहीर होताच सर्व इच्छुक उमेदवार तयारीला लागले. त्याच दरम्यान प्रारूप मतदार यादी जाहीर झाली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

निवडणूक आयोगाच्या कारभाराचा फटका शिंदे गटाच्या रत्नागिरी शहर संघटक पुजा दीपक पवार यांना बसला असल्याचे बोलले जाते. त्यांचे मतदार यादीतील नाव गायब झाले आहे. पूजा पवार रत्नागिरी नगर परिषदेच्या प्रभाग क्र.५ आणि क्र.६ मधून इच्छुक उमेदवार आहेत अशी चर्चा सुरू आहे. गेली चार-पाच वर्ष पूजा पवार या दोन्ही प्रभागात कार्यरत होत्या. नगर परिषद निवडणूक लढवण्याची त्यांनी तयारी केली होती मात्र निवडणूक आयोगाच्या कारभाराने त्यांची उमेदवारी अडचणीत आणल्याची चर्चा आता शिवसैनिकांमध्येसुध्दा सुरू झाली आहे.

टाईम्स स्पेशल

निवडणूक आयोगाच्या कारभारात सध्या अनेक शंका-कुशंका घेतल्या जात आहेत. रत्नागिरी शहरात दुबार मतदार नोंद, वास्तव्य एका प्रभागात आणि मतदाराचे नाव दुसर्‍या प्रभागात असेही प्रकार पुढे येत आहेत. ग्रामीण भागातील काही मतदारांची नावे शहरात आली असल्याचाही आरोप होत असल्याने राजकीय पक्षांना अतिशय जागरूकपणे निवडणूक लढवावी लागणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg