loader
Breaking News
Breaking News
Foto

श्रीशा पिंपरकर हिची चिन्मय गीता चॅटिंगच्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

संगमेश्वर (मकरंद सुर्वे) - संगमेश्वर जवळील निढळेवाडी येथील अवघी सहा वर्षीय चिमुकली श्रीशा अनुप पिंपरकर हिने अस्खलित संस्कृतमधील श्लोक मुखोदगत करून चिन्मय गीता चॅटिंग स्पर्धेच्या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये प्रवेश केला आहे. नॅशनल चिन्मय गीता चॅटिंग कॉम्प्युटिशन अंतर्गत चिन्मय मिशन मुंबई आयोजित श्रीमद्भगवद्गीता अध्याय १५ पुरुषोत्तम याग मधील सर्व संस्कृत भाषेतील श्लोक अगदी स्पष्ट व सराईतपणे मुखोदगत करून शालेय स्तरावर पहिले बक्षीस मिळवले. क्षेत्रीय स्तरावर पुन्हा पहिले बक्षीस तर अखिल मुंबई प्रदेश स्तरावर आणखी एक पहिले बक्षीस मिळून दिनांक ०२.११.२०२५ रोजी होणार्‍या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी श्रीशाची निवड झाली आहे. श्रीशाची अवघड संस्कृत शब्द उच्चारण क्षमता बघून आयोजकांसह प्रेक्षक थक्क झाले. सार्‍यांनी श्रीशाच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg