loader
Breaking News
Breaking News
Foto

बौद्धजन संघटनेचे उपाध्यक्ष लहू कांबळे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांचा आम. किरण सामंत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

लांजा (प्रतिनिधी) - लांजा तालुका बौद्धजन संघटनेचे उपाध्यक्ष लहू कांबळे यांच्यासह तालुक्यातील विविध बौद्धजन संघटनांचे अनेक पदाधिकारी यांनी आज आमदार किरण सामंत यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. या प्रसंगी आमदार किरण सामंत यांनी नवागत कार्यकर्त्यांचे स्वागत करताना पक्ष संघटन बळकटीसाठी सर्वांनी एकत्रित काम करण्याचे आवाहन केले. या प्रवेशामुळे तालुक्यातील शिवसेना संघटनेला नवी ताकद मिळाल्याचे पक्ष कार्यकर्त्यांकडून सांगण्यात आले. लांजा चालक-मालक संघटनेचे अध्यक्ष लहू कांबळे यांनी आपल्या सहकार्‍यांसह शिवसेना मध्ये प्रवेश केला. हा प्रवेश आमदार किरण सामंत यांच्या हस्ते संपन्न झाला. या वेळी आमदार सामंत म्हणाले, लहू कांबळे हे राजकारणासाठी नव्हे तर लांजा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी शिवसेनेत आले आहेत. विकासाच्या माध्यमातून शहरातील प्रत्येक घटकाचा सहभाग वाढवणे हेच त्यांचे ध्येय आहे. आमदार सामंत यांनी पुढे सांगितले की, लांजा शहरात विविध विकासकामे सुरू आहेत. नागरिकांनी एकजुटीने शिवसेनेच्या माध्यमातून ही कामे पुढे नेण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

झालेल्या पक्षप्रवेशांमध्ये लांजा ग्रामस्थ बौद्धजन मंडळ ग्रामीण बौद्धवाडी चे माजी अध्यक्ष दिलीप कांबळे, माजी अध्यक्ष आनंद कांबळे, अध्यक्ष सुदेश कांबळे, अध्यक्ष मधली वाडी मोहन कांबळे, उपाध्यक्ष राजेंद्र कांबळे, सेक्रेटरी विशाल पवार, संदीप कांबळे, राजन कांबळे, किशोर कांबळे, संदेश कांबळे, अंकुश कांबळे, नागेश कांबळे, बबन कांबळे, तुषार कांबळे, सिद्धार्थ कांबळे, तुषार कांबळे, भीमराज कांबळे, संदेश कांबळे, महेंद्र कांबळे, माणिका कांबळे, प्रकाश कांबळे, चंद्रकांत कांबळे, दिनेश कांबळे, अनंत कांबळे, सिकंदर कांबळे, चंद्रगुप्त कांबळे, पांडुरंग कांबळे, प्रवीण कांबळे, अमोल पडवळ, गणपत कांबळे ,सागर कांबळे, प्रजन कांबळे, केशव कांबळे, अरुण कांबळे, मुन्ना बाळू रंगी, पैगंबर नाईक, सुजल कांबळे, सखाराम कांबळे, अनिल कांबळे, संतोष जाधव ,बाळकृष्ण,साहिल झोरे, संतोष झोर,े सौरभ, प्रसाद कांबळे, गौतम कांबळे, तुषार माने, साई बाळूरंगी, मनमुली मौका साब मनमुली, रियाज मन मुली, कुतुब मनमुली, मेहबूब सुबड, सलीम सुबड, रियाज सुबड, बाजी कांबळे, साई बाळू रंगी, हजार मनखायान, नितीन कांबळे, नवनीत कांबळे, संजय कांबळे, प्रितेश कांबळे, रवी कांबळे, एडवोकेट रुपेश कांबळे यांच्यासह शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला.

टाइम्स स्पेशल

या कार्यक्रम प्रसंगी विधानसभा क्षेत्र प्रमुख राजू कुरूप तालुकाप्रमुख गुरुप्रसाद देसाई, विकास शेटे, एस एन कांबळे, सचिन डोंगरकर, नितीन शेट्टी, मुन्ना खामकर, प्रसाद माने, बाबा भिंगार्डे, सुजित आंबेकर, प्रसन्न शेटे, दिनेश पवार, नंदराज कुरूप, प्रसाद भाई शेट्ये, यांच्या सह सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. चालक-मालक संघटनेचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg