loader
Breaking News
Breaking News
Foto

खेड रिपाइं ला जागा वाटपात सन्मान न मिळाल्यास महायुतीला पाठिंबा नाही- रिपाइं खेड तालुका अध्यक्ष गौतम तांबे

आबलोली (संदेश कदम) - आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची जोरदार रणधुमाळी सुरू झाली आहे. राज्यात आणि देशात भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी महायुतीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्ष समाविष्ट आहे. निवडणुकीत रिपाइं पक्षाला कायम डावळण्याची भूमिका मित्र पक्षाकडून घेतली जाते. असा आरोप होऊ लागलाय. आगामी होऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत रिपाइं ला सन्मानाच्या जागा मिळाल्या पाहिजेत. खेड तालुकात भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी मित्रपक्षांनी रिपाइं ला समाधानकारक जागा दिल्या नाहीत तर आम्ही स्वबळावर निवडणूक लढवू, कोणत्याही परिस्थितीत महायुतीच्या उमेदवारांना पाठिंबा देणार नाही असा इशारा रिपाइं खेड तालुका अध्यक्ष गौतम तांबे यांनी दिला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

गौतम तांबे पुढे म्हणाले की खेड तालुक्यात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे मजबूत व बलाढ्य संघटन आहे. ग्रामपंचायत निवडणूक असो की पंचायत समिती, नगरपालिका, जिल्हापरिषद, विधानसभा, लोकसभा या निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांना बहुमताने निवडून आणण्यात रिपब्लिकन पक्षाची भूमिका, पाठिंबा व मते निर्णायक ठरतात. केवळ प्रचारात रिपाई पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा वापर, पक्षाच्या झेंड्याचा वापर महायुतीतील नेते व उमेदवार करताना दिसतात, मात्र ज्यावेळी निवडणूका येतात त्यावेळी मित्रपक्ष जागा वाटप व उमेदवार निवडीत रिपाइं ला कुठेही विचारात घेत नाहीत. जागा वाटप बैठकीत विचार विनिमय करण्यासाठी आमंत्रित करीत नाहीत. या निवडणुकीत आम्ही प्रत्येक घडामोडीवर लक्ष ठेवून आहोत, तालुक्यात राजकारणात सध्या जागा वाटप संदर्भात भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी यांच्यात सूर उमटत आहे, मात्र रिपाइं पक्षाला किती जागा हव्यात, रिपाइं पक्षाची निवडणुकीत महायुतीत निर्णायक भूमिका कशी मोलाची ठरते याच मूल्यांकन केले जात नाही याबाबत रिपाइं तालुका अध्यक्ष गौतम तांबे यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

टाईम्स स्पेशल

रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते शब्द, वचन व निष्ठेला पक्के आहेत. महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांच्या तसेच केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांच्या आदेशाचे तंतोतंत पालन करतात. महायुतीच्या उमेदवाराला बहुमताने निवडून आणण्यासाठी जीवाचे रान करतात, असे असताना महायुतीत जर आम्हाला सन्मान मिळाला नाही तर आम्हाला विचार करावा लागेल. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत खेड तालुकातील विविध जिल्हा परिषद, पंचायत समिती मतदारसंघात रिपाइं ला सन्मानाच्या जागा दिल्या जाव्यात व त्या निवडून आणण्यासाठी आम्ही ताकतीने लढूच मात्र महायुतीने देखील सहाय्य करावे, अन्यथा महायुतीच्या उमेदवारांना आम्ही कोणत्याच प्रकारचा पाठिंबा व सहकार्य करणार नाही, आम्ही आमची ताकत दाखवून देऊ असा इशारा तांबे यांनी शेवटी दिला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg