loader
Breaking News
Breaking News
Foto

पन्हाळेकाजी लेणी पाहण्यासाठी पर्यटकांचा ओघ वाढला

दापोली (प्रतिनिधी) - पन्हाळेकाजी लेणी पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांचा ओघ वाढता असला तरी लेणी परिसरात कोणत्याच प्रकारच्या सोयीसुविधा उपलब्ध नसल्याने येथे आलेल्या पर्यटक, इतिहासप्रेमी, अभ्यासकांची सोयीसुविधांच्या कमतरतेमुळे चांगलीच गैरसोय होत आहे. या ठिकाणी पर्यटकांचा इतिहासकांचा आणि अभ्यासकांचा येण्याचा सतत ओघ वाढत असला तरी रस्त्यावर दिशादर्शक फलक लावण्यात आलेले नाहीत. प्रत्येक लेण्यांच्या ठिकाणी माहिती दर्शविणारे माहितीपटाचे फलकही उभारण्यात आलेले नाहीत. एखाद्याला लघुशंका करावयाची झाल्यास येथे स्वच्छतागृहाची सोय नाही. खानपानाची सुविधा देणारे एखादे उपहारगृह नाही. गुगलवर माहितीसाठी सर्च मारायचे झाल्यास येथे नेट कनेक्टिव्हिटी मिळत नाही . आपल्या देशाच्या स्वातंत्र्याची ७८ वर्षं उलटून गेली तरी सुद्धा पर्यटनाला पुरक असलेली ठिकाणे अजूनही दुर्लक्षित ठेवून केंद्र शासन नेमके काय साधत आहे ? मग हाच का तो विकास आणि देशाची प्रगती असे नाइलाजाने म्हणावे लागत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

दापोली तालुक्यातील कोटजाई नदीच्या काठावर असलेल्या डोंगरामध्ये एकूण २९ गुहा खोदलेल्या आढळतात. अशी ही प्राचीन लेणी केंद्र शासनाच्या अखत्यारीतील भारतीय पुराततत्त्व विभागाच्या देखरेखीखाली आहेत. त्याच्या पूर्वेस १, २ ,३ व पश्चिमेस १०,११,१२, १३ हे वज्रयान पंथीय तर १४ व्या लेण्यात नाथपंथीय शिल्प भिंतीवर नाथसिद्धांची शिल्पे कोरलेली आहेत. १५ क्रमांकाचे लेणे मूळ बज्रयान व नंतर गाणपत्यपूजन यासाठी वापरले असावे असे वाटते येथे सुमारे ५ फूट उंचीचे गणपतीचे शिल्प दगडात कोरलेले आहे. अक्षोभ्याची, ध्यानस्थ बुद्ध अशा प्रतिमा अनेक लेण्यांमध्ये आहेत. पुढे शिल्लाहार काळात १९, २०, २१, २२, २३ ही लेणी निर्माण झाली. यामध्ये शिवलिंग, छतावर कमळाचे अलंकरण, बाजूच्या भिंतीवर रामायण, महाभारत, कृष्णलीला आदी प्रसंगांची शिल्पे कोरलेली आहेत. २९ व्या लेण्यात शिवलिंग, गणपती, लक्ष्मी, सरस्वती, गंगा यमुना यांची शिल्पे आहेत.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg