loader
Breaking News
Breaking News
Foto

सामाजिक कार्यकर्ते उदय मयेकर यांनी वाढदिवस साजरा न करता सविता आश्रम पणदूर यांना केला जीवनावश्यक वस्तू पुरवठा

दोडामार्ग (प्रतिनिधी) - दोडामार्ग येथील सामाजिक कार्यकर्ते उदय यशवंत मयेकर यांनी दिवाळी सणात आलेला आपला वाढदिवस साजरा न करता कुडाळ पणदूर येथील जीवन आनंद संस्थावतीने चालवणार्‍या सविता आश्रममध्ये जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा केला. आश्रममध्ये अनेक निराधार तसेच वयस्कर मंडळी, महिला पुरूष राहतात, यांची दिवाळी साजरी झाली पाहिजे यासाठी वाढदिवसवर उधळपट्टी न करता या रक्कमेतून उदय मयेकर यांनी सविता आश्रममध्ये लागणार्‍या जीवनावश्यक वस्तू उदा. तांदूळ, गहू, कडधान्य, इतर वस्तू प्रदान केल्या. यावेळी सविता आश्रमवतीने उदय मयेकर यांच्या सामाजिक उपक्रमबाबत आभार व्यक्त केले. यावेळी त्यांच्या समवेत सावू मयेकर, आरती मयेकर, यश मयेकर, तमन्ना मयेकर तसेच सविता आश्रममधील मंडळी उपस्थित होती.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg