loader
Breaking News
Breaking News
Foto

पर्यटकांच्या कारच्या धडकेत वीजेचा खांब तुटून कारवर कोसळला

मालवण (प्रतिनिधी) - देवबाग येथून मालवणच्या दिशेने येणाऱ्या पर्यटकांच्या कारने तारकर्ली सुतारवाडी येथील रस्त्याच्या कडेला असलेल्या सिमेंटच्या वीजेच्या खांबाला जोरदार धडक दिल्याने वीज खांब तुटून कारवर कोसळल्याची दुर्घटना आज सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास घडली. सुदैवाने या अपघातात कारमधील कोणीही जखमी झाले नाही. मात्र वीजेचा खांब कोसळून व वीज तारा तुटून वीज वितरण कंपनीचे नुकसान झाले तर कारच्या दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार मुंबईहून मालवणात पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांची वॅगनार कार आज सकाळी देवबाग येथून मालवणच्या दिशेने जात असताना तारकर्ली सुतारवाडी येथे साई मंदिर मार्गावर रस्त्याच्या कडेला असलेल्या सिमेंटच्या वीज खांबाला धडकली. कार रस्त्याच्या विरुद्ध बाजूला येऊन पोलाला धडकल्याने चालकाचे नियंत्रण सुटले असावे, अशी चर्चा होती. या जोरदार धडकेत वीज पोल मुळातून तुटून कारच्या दर्शनी भागावर कोसळला. यामुळे गाडीची पुढील काच फुटून दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाले. या कारमधून प्रवास करणारे चार पर्यटक सुदैवाने बचावले. यावेळी स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत पर्यटकांना गाडीच्या बाहेर काढले.

टाइम्स स्पेशल

कारच्या धडकेत वीजेचा खांब कोसळून वीज वाहिन्याही तुटल्या. मात्र मोठा अनर्थ टळला. या दुर्घटनेत वीज कंपनीचे नुकसान झाले. या दुर्घटनेमुळे त्या भागातील वीज पुरवठा खंडित झाला होता. यावेळी वीज वितरण कंपनीचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दखल झाले होते. वीज कर्मचारी व स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने वीजेचा खांब हटवून कार टोचन वाहनाच्या मदतीने रस्त्यावरून बाजूला करण्यात आली. या दरम्यान तारकर्ली रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक खोळंबाही झाला होता. स्थानिकांनी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी अथक मेहनत घेतली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg