loader
Breaking News
Breaking News
Foto

महामार्गावर ‘ओंकार’ हत्तीचा ठिय्या, वाहतूक दीड तास ठप्प

बांदा (प्रतिनिधी) - मागील काही दिवसांपासून बांदा, मडुरा आणि आसपासच्या गावांमध्ये हाहाकार माजवणारा ‘ओंकार’ हत्ती आज पुन्हा एकदा अवतरला. शनिवारी सकाळी तो थेट मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर उतरला. इन्सुली डोबवाडी येथे हत्तीने रस्त्यावरच ठिय्या मारल्याने महामार्गावरील वाहतूक तब्बल दीड तास ठप्प झाली. यानंतर हत्तीने इन्सुलीतील भरवस्तीच्या कुडवटेम्ब व सावंतटेम्ब परिसरात प्रवेश केला. सायंकाळी सुमारे सहाच्या सुमारास तो महामार्गावर आल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. वाहनांच्या हॉर्नकडे पूर्ण दुर्लक्ष करत तो शांतपणे रस्त्याच्या मधोमध उभा राहिला. परिणामी दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या आणि प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

घटनेची माहिती मिळताच बांदा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक नियंत्रित केली. त्याचवेळी वनविभागाचे अधिकारी आणि जलद कृती पथक तातडीने पोहोचले. हत्तीला जंगलाकडे वळवण्यासाठी फटाके वाजविण्यात आले, मात्र त्याने महामार्ग ओलांडत पुन्हा इन्सुली गावात प्रवेश केला. दरम्यान, मागील पंधरा दिवसांपासून ‘ओंकार’ हत्तीने मडुरा, कास परिसरात थैमान घातले असून शेतकर्‍यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. नागरिकांमध्ये सतत भीतीचे सावट निर्माण झाले असून वनविभागाने हत्तीला पकडण्यासाठी राबवलेली मोहीम अद्याप निष्फळ ठरली आहे.

टाईम्स स्पेशल

स्थानिक ग्रामस्थांनी वनविभागाकडे अधिक प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी केली असून, आमच्या रोजच्या जगण्यावर हा हत्ती संकट बनला आहे, अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली. शेवटी, हत्ती जंगलाच्या दिशेने वळल्याने वाहतूक पुन्हा सुरू झाली आणि परिस्थिती काहीशी सामान्य झाली. तथापि, ‘ओंकार’ पुन्हा महामार्गावर परत येईल का? या प्रश्नाने नागरिक आणि वाहनचालक अद्यापही धास्तावलेले आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg