loader
Breaking News
Breaking News
Foto

शिवसेना शिंदे गटात भाजपच्या माजी शहराध्यक्षांसह ४० जणांचा प्रवेश

सावंतवाडी (प्रतिनिधी): सावंतवाडी शहरातील प्रभाग क्रमांक ९ मधील भाजपच्या ४० पदाधिकार्‍यांसह भाजपचे माजी शहराध्यक्ष आणि जिल्हा कार्यकारिणी सदस्य अजय गोंदावळे यांनी मित्र पक्ष असलेल्या शिवसेना (शिंदे गट) पक्षात प्रवेश केल्याने सावंतवाडीतील भाजपला मोठा धक्का बसला आहे. सावंतवाडी शहरात भाजपच्या शहराबाहेरील पदाधिकार्‍यांकडून होणारी लुडबूड आणि लावालावी यामुळे मनस्ताप होत असल्याने हा प्रवेश करत असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. आमदार दीपक केसरकर यांच्या निवासस्थानी हा पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी बोलताना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी अजय गोंदावळे हे साडेचार वर्षे भाजपचे शहराध्यक्ष होते, त्यांच्या प्रवेशाने पक्षाची ताकद वाढली आहे. त्यांच्याकडे दातृत्व आणि नेतृत्व असल्याने येणार्‍या काळात निश्चितच फायदा होईल आणि पक्षात त्यांचा योग्य तो सन्मान केला जाईल, असा विश्वास व्यक्त केला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

अजय गोंदावळे यांनी यावेळी बोलताना, सावंतवाडी शहरात भाजपच्या शहराध्यक्ष म्हणून साडेचार वर्ष काम पाहिले. मात्र, एसटी महामंडळाचे पद देताना माझा राजीनामा किंवा कोणतीही कल्पना न देता मला तिथून ’डिच्चू’ देण्यात आला. तसेच, सावंतवाडी भाजपमधील अंतर्गत कलहामुळे शहरात काम करताना मनस्ताप होत असल्याने आपण राजीनामा दिला. आता आमदार दीपक केसरकर, आमदार निलेश राणे आणि संजू परब यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले. शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी, सावंतवाडी शहरात संपर्क असलेले अजय गोंदावळे आणि त्यांच्या ४० सहकार्‍यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे, यापुढेही प्रवेश घेतले जातील. भाजपच्या स्थानिक नेत्यांनी ’मैत्रीपूर्ण लढतीची’ घोषणा केल्यामुळे आम्हीही ’मैत्रीपूर्ण प्रवेश’ घेत आहोत. ’ते उबाठा पक्षात जाणार नाही’ याची खबरदारी घेऊन ते शिवसेनेत येतील यासाठी आमचे प्रयत्न होते आणि ते आम्ही प्रवेशाच्या वेळी सिद्ध केले, असे ते म्हणाले.

टाइम्स स्पेशल

आम्ही लढवय्ये शिवसैनिक असून, यापुढे कोणत्याही पक्षातील मान्यवरांना शिवसेना (शिंदे गट) प्रवेशाची द्वारे खुली आहेत. पक्षात प्रवेश घेणार्‍यांना मान, सन्मान दिला जाईल. आमदार दीपक केसरकर आणि आमदार निलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना संघटना बांधणी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये विजय मिळविण्यासाठी विधानसभा मतदारसंघ काम सुरू आहे, असेही संजू परब यांनी सांगितले. यावेळी माजी शक्ती केंद्र शहर सचिव मंदार पिळणकर, बुथ अध्यक्ष ज्ञानेश्वर पाटकर, युवा मोर्चा शहर अध्यक्ष राज वरेरकर यांच्यासह एकूण ४० पदाधिकार्‍यांनी प्रवेश केला. यावेळी माजी जिल्हाप्रमुख अशोक दळवी, शहर प्रमुख बाबू कुडतरकर, महिला शहर प्रमुख भारती मोरे, सचिव परिक्षीत मांजरेकर, युवक तालुकाध्यक्ष क्लेटस फर्नांडिस, गजानन नाटेकर, विनोद सावंत आदी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg