loader
Breaking News
Breaking News
Foto

विठ्ठल मंदिराचे सुशोभीकरण पुढच्या एकादशीपर्यंत पूर्ण होईलः नाम. उदय सामंत

रत्नागिरी : भाजप-शिवसेना महायुतीमध्ये किती समन्वय आहे, हे आज स्पष्ट झाले आजच्या कार्यक्रमाचे सर्व नारळ भाजपच्या पदाधिकार्‍यांनी फोडले. माझ्या माध्यमातून जो काही विकास होतोय, त्याचे सर्व श्रेय मी माझ्या मतदारांना देतो. त्यांच्यामुळे आज ३०० वर्षांपूर्वीच्या विठ्ठल मंदिलाच्या सुशोभिकरणाचे काम माझ्या हस्ते झाले, म्हणजे माझ्या सारखा भाग्यवान दुसरा कोणी नाही. मी तुम्हाला शब्द देतो पुढची एकादशी नवीन विठ्ठल मंदिरात होईल. मला अनेकांनी खड्ड्यात घालण्याचा प्रयत्न केला, परंतु तुम्ही जोवर माझ्याबरोबर आहात तोवर मला कोणाची भिती नाही. निवडणुकीच्या तोंडवार बोलणार्‍या काही उपर्‍यांचा सल्ला घेण्याची मला गरज नाही, असा टोला पालकमंत्री उदय सामंत यांनी दिला. प्रती पंढरपुर म्हणून ओळखल्या जाणार्‍या शहरातील विठ्ठल मंदिराच्या सुशोभिकरणाच्या कामाचे भुमिपूजन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी माजी नगराध्यक्ष अशोक मयेकर, मुन्ना सुर्वे, माजी नगराध्यक्ष प्रमोद रेडीज, बिपिन बंदरकर, बंड्या साळवी, विजय पेडणेकर, आनंद मराठे आणि राहुल पंडित आदी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

उदय सामंत म्हणाले, रत्नागिरीची आस्मिता म्हणून विठ्ठल मंदिर, भैरी देवस्थान, काशिविश्वेर ही मंदिर आहेत. त्यांचे सुशोभिकरण करणे हे लोकप्रतिनिधी म्हणून आमचे कर्तव्य आहे. मी स्वतःला भाग्यवान समजतो हे करण्याची संधी मला विठ्ठलाने दिली. विठ्ठल मंदिराच्या सुशोभिकरणासाठी ३ कोटीचा निधी दिला आहे. या मंदिरात बारमाही धार्मिक कार्यक्रम होत असल्याने लवकरात लवकर काम पूर्ण करण्याच्या सूचना ठेकेदाराला दिल्या आहे. त्यांनी वर्षांमध्ये हे काम पुर्ण करण्याचा शब्द दिला आहे. म्हणजे ही एकादशी सोडली तर पुढची एकादशी नवीन विठ्ठल मंदिरात हाईल. माझ्या पाठिमागे ठाम उभा राहणार्‍या जनतेसाठी जिल्हा नियोजनच्या निधीची किल्ली तुमच्याकडे आहे. तुम्ही सांगल ते विकास काम केले जाईल. रत्नागिरीत आज मोठ्या प्रमाणात विकास सुरू आहे. सर्वांत मोठा छत्रपती संभाजींचा पुतळा आपण उभा केला. विठ्ठलाचा सर्वांमत उंची मुर्ती रत्नागिरीत आहे, आरबी समुद्राच्या बाजूला छत्रपती शिवाजी महाराज यांची शिवसृष्टी उभारण्यात आली आहे. आतापर्यंत सुमारे एक लाख पर्यटकांनी त्याला भेट दिली.

टाईम्स स्पेशल

चंपक मैदानावर सुमारे १५ हजार कोटींची गुंतवणुक असलेला सेमी कंडक्टरचा प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आहे. भारतरत्न मिळालेल्या कोकणातील सहा राष्ट्रपुरूषांचे पुतळे तारांगण परिसरात उभारले. गाड्यांच्या टाकाऊ वस्तुंपासून हे पुतळे उभारण्यात आले, रत्नागिरीत शासनाने बांधलेले पहिले बौद्धविहार होतय, अशा प्रकारे रत्नागिरीचा विकास सुरू आहे. परंतु काहींना निवडणुकीच्या तोंडावर पोटशूळ उठला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg