loader
Breaking News
Breaking News
Foto

खेडमध्ये कोकणरत्नच्या नवीन शाखेचे उद्योजक वसंतदादा उदेग यांच्या हस्ते उदघाटन

खेड : तालुक्यात अल्पावधीत नावाजलेल्या शहरातील कोकणरत्न नागरी सहकारी पतसंस्थेच्या नूतन शाखेचे उदघाटन दीपावली पाडव्याच्या मुहूर्तावर चिपळूणचे प्रसिद्ध उद्योजक वसंतदादा उदेग यांच्या हस्ते करण्यात आले. शहरातील मुकादम रॉयल आर्केड मध्ये स्वमालकीच्या प्रशस्त जागेत शहर वासियांसाठी नवीन शाखा सुरु करण्यात आली आहे. भरणे येथे सन २०१४ साली पहिली शाखा सुरु करण्यात आली होती. यावर्षी पतसंस्थेने सुमारे २६ लाख रुपयांचा नफा मिळवला असून संस्थेकडे २० कोटी रुपयांच्या ठेवी जमा आहेत. पतसंस्था अध्यक्ष उमेश नक्षे यांनी अध्यक्षीय भाषणात संस्थेच्या स्थापनेपासूनचा आढावा घेतला आणि लवकरच पतसंस्था ५० कोटी ठेवी चा टप्पा गाठाण्याचा मानस व्यक्त केला. यनिमित्ताने पतसंस्थेच्या वतीने संचालकांच्या विशेष गुणवंत पाल्यांचा गौरव उद्योजक वसंत उदेग यांच्या हस्ते करण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यामध्ये उर्वशी घोले, श्रवण कडव, यश धुलप, पूर्वा कुळे, आर्या कुळे, माधुरी पवार व विवेक कडव समावेश आहे. या कार्यक्रमाला माध्यमिक शिक्षक पतपेढीचे संचालक राजेंद्र चांदीवडे, माजी संचालक अमित कदम, मुरली मनोहर पतसंस्थेचे संचालक अजित बुटाला, श्रमिक पतसंस्थेचे संचालक रामचंद्र शिगवण आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी उपाध्यक्ष तुषार धुलप, संचालक निलेश पंडम, सूरज धाडवे, राम रेमजे, भरत घोले, स्वरा उसरे, भाग्यश्री कडव, महेंद्र पवार, सचिन कुळे, रामचंद्र बुदर, परशुराम दवंडे यांच्या सह मुख्य कार्यकारी अधिकारी अमित धाडवे, शाखाधिकारी संकेत शिंदे, सूरज जाधव, नम्रता खामकर, रुपेश पदुमले, शुभम कदम, वरूण उमासरे, विशाल साखरकर आदींनी प्रयत्न केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीकांत कदम, आभार सूरज धाडवे यांनी तर सूत्रसंचालन सुजित शिंदे यांनी केले.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg