loader
Breaking News
Breaking News
Foto

पोलिसांनी खाक्या दाखवताच PSI बदने रडला ढसाढसा, म्हणाला....

फलटण येथील वैद्यकीय अधिकारी संपदा मुंडे यांच्या आत्महत्येनंतर विविध दावे केली जात आहेत. संपदा मुंडे यांनी होणाऱ्या जाचानंतर आत्महत्येसारखे मोठे पाऊस उचलले. फक्त आत्महत्याच नाही तर त्यांनी त्यापूर्वी हातावर एक नोट लिहित पीएसआय गोपाळ बदने आणि पोलिस कर्मचारी प्रशांत बनकर यांच्यावर गंभीर आरोप करत मानसिक आणि शारिरीक त्रास दिल्याचे म्हटले. फलटण येथील हॉटेलमध्ये त्यांनी आत्महत्या केली. यासोबतच संपदा मुंडे यांच्या कुटुंबियांनीही काही आरोप केली आहेत. संपदा यांच्या आत्महत्येनंतर पीएसआय बदने हा फरार होता तर रात्री साडेबारानंतर तो थेट फलटण पोलिस ठाण्यात पोहोचला आणि त्याने शरणागती घेतली. त्यानंतर शहर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आणि एक तास कसून चाैकशी केली.रात्री उशिरा त्याला मेडिकलसाठी नेण्यात आले आणि परत त्याला साधारण चारच्या दरम्यान ठाण्यात आणण्यात आले. नुकताच मिळालेल्या माहितीनुसार, पोलिस चाैकशीमध्ये आरोपी पीएसआय गोपाळ बदने हा ढसाढसा रडला. त्या मुलीसोबत कोणत्याही प्रकारची अत्याचार आपण केला नसल्याचे सांगताना तो दिसला. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या प्रश्नाची उत्तरे देताना मी अत्याचार केला नसल्याचे सांगत तो रडला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

अखेर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणात पीएसआयने आपले तोंड उघडले. यादरम्यान त्याला महिला डॉक्टर संपदा मुंडे यांच्यासोबत नेमके काय संबंध होते आणि संमतीने लैंगिक संबंध ठेवण्यात आले होते का? हे विचारले असता त्याने उत्तर दिले नाही. मुळात म्हणजे स्वत: आरोपी हा पीएसआय असल्याने त्याला तपास आणि चाैकशी कशी होणार याबद्दलची सर्वच कल्पना आहे. त्यानुसार, तो बोलत आहे.

टाइम्स स्पेशल

पोलिसांसमोरही मोठे आव्हान पीएसआय गोपाळ बदने याच्याकडून काही गोष्टी कबूल करून घेण्याचे असणार आहे. गोपाळ बदने नेमका कुठे लपून बसला होता आणि यादरम्यान त्याला कोणी मदत केली, कोणाला भेटला याचाही तपास पोलिसांकडून केला जात आहे. आज कोर्टात हजर केल्यानंतर त्याला पोलिस कोठडी होण्याची शक्यता आहे. मात्र, 28 वर्षीय महिला डॉक्टरच्या केसमध्ये एका पोलिस अधिकाऱ्यासह एक पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणात काही मोठे खुलासेही होऊ शकतात.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg