loader
Breaking News
Breaking News
Foto

लोटे गुरुकुलात विद्यार्थ्यांवर रॅगिंग? पुन्हा नवा वाद — वर्गाच्या माॅनिटरवर विद्यार्थ्यांशी गैरवर्तनाचा गुन्हा

खेड : खेड तालुक्यातील लोटे परशुराम औद्योगिक क्षेत्रातील संत ज्ञानेश्वर माऊली जीवनमुक्त गुरुकुल या अध्यात्मिक शिक्षण देणाऱ्या शाळेत पुन्हा एक नवीन वाद निर्माण झाला आहे. या शाळेतील वर्गाचा माॅनिटर असलेल्या विद्यार्थ्यावर इतर विद्यार्थ्यांशी गैरवर्तन केल्याच्या आरोपावरून खेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वर्गाचा हा मॉनिटर इतर विद्यार्थ्यांचे आपल्या मोबाईल मध्ये नग्न फोटो आणि व्हिडिओ करून त्यांना ब्लॅकमेल करीत असल्याचा प्रकार उजळत आला आहे, तसेच गुरुकुलातील काही विद्यार्थ्यांना तत्सम पदार्थांचे व्यसन करण्यास देखील हा भाग पाडत होता अशी ही तक्रारीत नमूद करण्यात आली आहे एका विद्यार्थ्याच्या पालकांनी ही तक्रार दिल्यानंतर त्या अल्पवयीन मॉनिटरवर खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे गेल्या आठवड्यापासून या गुरुकुलाचे प्रमुख कोकरे महाराज यांच्यावर विद्यार्थिनींच्या विनयभंगा प्रकरणी पोस्कोचे दोन गुन्हे दाखल झाले असून हे प्रकरण ताजे असतानाच पुन्हा हा रॅगिंग सारखा प्रकार उजळण्यात आल्याने खळबळ उडाली आहे

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या संदर्भात गुन्हा रजिस्टर नंबर 0315/2025 असा गुन्हा भारतीय न्याय संहिता अधिनियम 2023 चे कलम 74, 79, 131, 352, 351(2) अंतर्गत नोंदविण्यात आला आहे. फिर्याद चंद्रकांत हुलगप्पा धोत्रे , ता. चिपळूण) यांनी दाखल केली आहे.

टाइम्स स्पेशल

फिर्यादीत नमूद केल्याप्रमाणे, त्यांची दोन मुले संबंधित गुरुकुल शाळेत शिक्षण घेत आहेत. या शाळेतील माॅनिटर हा काही विद्यार्थ्यांशी गैरवर्तन करीत असल्याची माहिती समोर आली असून, या प्रकाराबाबत कायदेशीर तक्रार दाखल करण्यात आली आहे. घटना सप्टेंबर 2025 मध्ये घडल्याचे नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक श्री. विवेक अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. दरम्यान, या गुरुकुलाचे प्रमुख ह.भ.प. भगवान कोकरे महाराज यांच्यावरही यापूर्वी एका स्वतंत्र प्रकरणात पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल असून, त्यांना न्यायालयाने 31 ऑक्टोबर 2025 पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या नव्या प्रकरणामुळे गुरुकुलाच्या कार्यपद्धतीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, प्रशासनाच्या पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg