loader
Breaking News
Breaking News
Foto

दिपावली सणाच्या सलग सुट्ट्यांमुळे गुहागर मध्ये पर्यटकांची गर्दी

वरवेली (गणेश किर्वे) - दिपावली सणाच्या सुट्टीचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची पावले निसर्गरम्य अशा गुहागर तालुक्याकडे वळली आहेत. आठवडाभर असलेल्या सुट्ट्यांमुळे पर्यटकांनी गुहागर तालुक्यातील विविध धार्मिक स्थळांना भेटी देण्याबरोबरच गुहागर शहरालगत असलेल्या समुद्रामध्ये स्नान करण्याचा आनंद घेत आहेत. गुहागर येथील श्री व्याडेश्वर'मंदिर, श्री दुर्गादेवी मंदिर, वेळणेश्वर येथील श्री वेळणेश्वर मंदिर, हेदवीतील श्री दशभूज लक्ष्मी गणेश मंदिर, उफराटा गणेश मंदिर, श्री व्याघ्रंबरी देवी मंदिर, वरवेली गावची ग्रामदेवता श्री हसलाई देवी मंदिर येथील धार्मिक स्थळांना भेटी दिल्यानंतर सायंकाळी गुहागर बीचवर समुद्र स्नानाचा आनंद घेता घेता सूर्यास्त पाहण्याचा आनंद घेत आहेत.अंजनवेल येथील दीपगृह', शिवकालीन गोपालगड किल्ला पाहण्याचा आनंदही पर्यटक घेत आहेत. गुहागर शहरांमध्ये पर्यटकांमुळे गर्दी वाढल्यामुळे गुहागर शहरात वाहतूक कोंडीची समस्या वाढली असून, त्याकडे पोलीस प्रशासनाचे गुहागर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक कोंडी दूर करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे पर्यटकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत नाही.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

दिवाळीची शाळा-महाविद्यालयांना सुट्टी असल्यामुळे दिवाळी साजरी साजरी करण्याबरोबरच देव दर्शन व येथील निसर्ग सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी आसपासच्या जिल्ह्यातूनच नव्हे तर परराज्यातील पर्यटकांचेही आगमन गुहागर तालुक्यात झाले आहे. पर्यटनाचा हंगाम अद्याप सुरू झाला नसला तरी दिवाळी सणाच्या सलग सुट्ट्या असल्याने पर्यटक गुहागर तालुक्यातील धार्मिक स्थळे तसेच येथील निसर्ग सौंदर्याचा आस्वाद येत आहेत. गुहागर तालुक्यातील विविध तीर्थक्षेत्रांसह पर्यटनस्थळांना भाविक भेटी देतात. गुहागरातील निसर्गसौंदर्यासह निळाशार समुद्र पर्यटकांना भुरळ घालत असल्यामुळे पर्यटकांची अधिक पसंती गुहागरला आहे. सध्या गुहागर पर्यटकांनी फुलले असून सकाळ, सायंकाळ पर्यटक गर्दी करत आहेत. गुहागर शहरात रस्त्याच्या दुतर्फा वाहने पार्क केली जात असल्यामुळे वाहनांच्या रांगाच रांगा लागत आहेत.परंतु गुहागर पोलिसांकडून गुहागर पोलीस परेड ग्राउंड येथे वाहने पार्किंग करावीत अशा सूचना केल्या जात आहेत आणि या सूचनांचे पालन देखील पर्यटकांकडून केले जात आहे.धार्मिक स्थळांना भेटी दिल्यानंतर भाविक समुद्रकिनाऱ्यावर बराच वेळ घालवत आहेत.

टाइम्स स्पेशल

वॉटर स्पोर्ट्स, घोडेसवारी, उंट सवारी, याशिवाय समुद्रस्नानाचा आनंद घेत आहेत. समुद्रात जास्त खोल जाऊ नका, या सूचनेकडे दुर्लक्ष करत पर्यटक मनमानी करत असल्याचा अनुभव आताही येत आहे.हॉटेल्स, लॉजिंग व्यवसायांना सुगीचे दिवस आले असून पर्यटकांची संख्या वाढल्यामुळे हॉटेल्स, लॉजिंग व्यवसायाला सुगीचे दिवस आले आहेत. पर्यटकांकडून कोकणी खाद्यपदार्थांना वाढती मागणी आहे. मांसाहारामध्ये येथील माशांना पसंती दर्शविली जात आहे. शाकाहारीमध्ये खास कोकणी जेवण सोबत गुहागर मधील प्रसिद्ध उकडीच्या मोदकांचा आस्वाद घेतला जात आहे. हॉटेल अन्नपूर्णा येथील सोलकढी संपूर्ण महाराष्ट्र मध्ये प्रसिद्ध आहे. आणि या सोलकढीचा आस्वाद देखील पर्यटकांकडून घेतला जात आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg