loader
Breaking News
Breaking News
Foto

दिवाळीच्या निमित्ताने दाभोळ गाव स्वरांच्या झंकाराने निघाले उजळून

दापोली (वार्ताहर) : दिवाळीच्या निमित्ताने दाभोळ गाव खऱ्या अर्थाने स्वरांच्या झंकाराने उजळून निघाले. सागरपुत्र विद्या विकास संस्था आणि लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने दाभोळ येथे नुकतीच ब्रह्मनाद ग्रुप निर्मित ‘गंध स्वरांचा’ संगीत मैफल रंगली. दिवाळीच्या सणाचे औचित्य साधत आयोजित केलेल्या या कार्यक्रमाने दाभोळच्या सांस्कृतिक परंपरेला एक नवे सुरेल पान जोडले. ब्रह्मनाद ग्रुपचा दाभोळमधील हा पहिलाच प्रयत्न असून, संगीतप्रेमींच्या उत्स्फूर्त उपस्थितीने तो यशस्वी ठरला. संगीतप्रेमी लोकांना एकत्र आणणे, त्यांच्या कलांना व्यासपीठ मिळवून देणे आणि नवोदित कलाकारांना प्रोत्साहन देणे हा या मैफिलीमागचा मूळ हेतू होता. दिवाळीच्या आनंदात संगीताचा सुवास मिसळत गंध स्वरांचा या उपक्रमाने दाभोळच्या सांस्कृतिक परंपरेत एक नवा अध्याय लिहिला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

कार्यक्रमाची सुरुवात गणेशपूजन आणि दीपप्रज्वलनाने झाली. ज्येष्ठ नागरिक अनंत महाकाळ गुरुजी, किशोर तांबडे, नाना शिगवण आणि किरण फडणीस यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे शुभारंभ करण्यात आला. त्यानंतर मंचावर सुरेल वातावरणाची निर्मिती झाली. अजित जोशी यांनी सादर केलेल्या “नमन नटवरा विस्मयकारा” या नांदीने सुरुवात करण्यात आली. ओंकार स्वरूपा, अबीर गुलाल उधळीत रंग, तुझे नाम आले ओटी, गेला दसरा आली दिवाळी हसू नाचू या हो, सखी मंद झाल्या तारका, या भवनातील तीत , वृंदावनी वेणु वाजे, प्रथम तुझं पाहता, कानडा राजा पंढरीचा, गणपती गणराज, कानडाऊ विठ्ठलू कर्नाटकू, नाम तुझे, संत भार पंढरीत, सुखवी तया, मन माझे भुलले, दत्तनामाचा महिमा, अशा भावस्पर्शी गीतांनी वातावरण भारावून गेले. “जातो जिथे जिथे मी” या भैरवीने या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. डॉ. आनंद गोंधळेकर, अजित जोशी, डॉ. दिलेश मुरकर, संदेश कुलाबकर, महेश सोमण, मधुकर गुरव आणि कु. श्रावणी गोंधळेकर यांनी आपल्या अप्रतिम गायनाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. ऑर्गन/संवादिनीवर महेश सोमण आणि नाना कुलाबकर, तबल्यावर साध. मकरंद सोमण, पखवाद साथीसाठी मंदार सोमण आणि संदेश कुलाबकर, तर तालवाद्यसाठी नाना कुलाबकर आणि संदेश कुलाबकर यांनी साथ दिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. आनंद गोंधळेकर यांनी केले.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg