loader
Breaking News
Breaking News
Foto

एनसीसीच्या प्रिमेनू कॅम्पला रत्नागिरीत प्रारंभ

रत्नागिरी : एनसीसीच्या प्रिमेनू कॅम्पला रत्नागिरीत सुरुवात झाली. हा कॅम्प २ नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे. या कॅम्पसाठी अनेक जिल्ह्यांमधून राष्ट्रीय छात्र सेनेचे कॅडेट सहभागी झाले आहेत. हा कॅम्प रत्नागिरी ते विजयदुर्ग या मेन्यू सेलिंग एक्सपिडिशनचा अधिकृत पूर्वप्रसारक आहे. कॅडेटसनी जलतरणतील कौशल्य चाचणी पूर्ण करीत कार्यक्षमता व उत्कृष्टतेसाठी त्यांची तत्परता सिद्ध केली जाते. त्यानंतर भाट्ये किनाऱ्यावर प्रत्यक्ष प्रशिक्षण घेतले जाते. तेथे सहभागींना आगामी मोहिमेसाठी आवश्यक जलतरण कौशल्य आणि संघभावनेशी संबंधित कौशल्य प्राप्त झाले आहेत. या उपक्रमामुळे शिस्त, नेतृत्व आणि नागरी सहभागाचे मूल्य अधेरेखित होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या कॅम्पमध्ये १ अधिकारी, २ नेव्ही अधिकारी, २ एनसीसी ऑफिसर, २ जे सी आय, ८ नेव्ही स्टाफ, १ आर्मी स्टाफ, ११ सिव्हिल स्टाफ आणि १८३ राष्ट्रीय छात्र सेनेचे कॅडेट विदयार्थी प्रशिक्षण घेत आहे. दोन महाराष्ट्र नेव्हल युनिट एनसीसीचे कमांडिंग ऑफिसर कमांडर रामांजुल दीक्षित यांच्या मार्गदर्शनाखाली कॅम्पचे आयोजन होत आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg