loader
Breaking News
Breaking News
Foto

पालपेणे येथे आम. भास्करशेठ जाधव यांची सरकारवर सडकून टीका

वेळणेश्वर (उमेश शिंदे) - देशामध्ये ७४ वी घटनादुरुस्ती झाली. आणि त्या घटनादुरुस्तीमध्ये अशा प्रकारचा कायदा करण्यात आला की, कुठलीही निवडणुकीची पाच वर्षापेक्षा जास्त पुढे ढकलता येत नाही. फार फार तर विधानसभा किंवा लोकसभा यांची मुदत संपल्यानंतर पंधरा दिवसांच्या पेक्षा जास्त ते सरकार अस्तित्वामध्ये ठेवता येत नाही तशाच पद्धतीने ग्रामपंचायत असतील, सोसायटी असतील, पंचायत समित्या असतील किंवा जिल्हा परिषद असतील, नगरपंचायती असतील किंवा महानगरपालिका असतील यांचा पाच वर्षाचा कालावधी संपला, हा कालावधी संपण्यापूर्वीच निवडणुका घेतल्याच पाहिजेत अशा प्रकारची ७४ व्या घटना दुरुस्ती तरतूद करण्यात आली. कायदा करण्यात आला परंतु त्यापूर्वी अशा निवडणुका वेळच्यावेळी होत नव्हत्या. काही निवडणुका वेळच्यावेळी व्हायच्या काही निवडणुका वेळच्यावेळी व्हायच्या नाहीत. आणि जे कोणी सत्तेवर असणारे मंडळी नेते मंडळी त्यांच्या सोयीने या अशा पद्धतीच्या निवडणुका कधीकधी केव्हाही घ्यायचे कितीही निवडणूका लांबवायचे तू आज देशांमध्ये जे सरकार आहे ते सरकार सगळेच काय ते नियम, प्रथा परंपरा धाब्यावर बसवत आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

त्यांनी सगळ्यात संस्थांची ज्याला खर्‍या अर्थाने स्वास्थ्य संस्था म्हणतात त्या संस्थांची पूर्णपणे तोडमोड केलेली आहे वाटोळे लावलय आणि आपल्याला वाटेल तशा पद्धतीने कायदा न मानता आपला देश म्हणजे प्रत्येक देशाची एक घटना असते त्या घटने अनुरूप राज्य सरकार कारभार चालवते परंतु विद्यमान सरकारने ती घटना पाळलीच नाही. अशी सडकून टीका गुहागरचे आमदार भास्करशेठ जाधव यांनी केली. गुहागरचे आम. भास्करशेठ जाधव यांनी आज गुहागर तालुक्यातील पालपेणे येथे असगोली जि. प. गट उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाची बैठक घेतली होती. यावेळी आम. भास्करशेठ जाधव यांनी राज्यांमध्ये गेल्या दोन-तीन वर्षापासून रखडलेल्या निवडणुका वरून राज्य सरकारवर सडकून टीका केली ते बोलताना पुढे म्हणाले की हे सरकार निवडणुका घ्यायच्या मनस्थितीत नव्हतं.

टाईम्स स्पेशल

खालचा कारभार लोकप्रतिनिधींच्या हातात जाऊच नये तसेच सरकारी अधिकार्‍यांना हाताशी धरून सर्व कारभार मंत्र्यांनीच चालवायचा यासाठी त्यांचे प्रयत्न चालू होते. त्यांच्या या प्रयत्नांना कोर्टाच्या निर्णयाने छेद दिला आहे. मागील तीन वर्षापासून रखडलेल्या निवडणुका येत्या ३१ जानेवारीपर्यंत कोणत्याही परिस्थितीत घ्यायचेच आहेत. असं कोर्टाने सांगितले आहे अशी ही माहिती आमदार भास्कर जाधव यांनी सरकारवर टीका करताना दिली. यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जेष्ठ शिवसैनिक विनायक मुळे, जिल्हाप्रमुख विक्रांत जाधव, तालुकाप्रमुख सचिन बाईत, सिद्धीताई सुर्वे , संजय पवार यांचेसह असगोली जि. प. गटातील महिला, पुरुष, पदाधिकारी, कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg