loader
Breaking News
Breaking News
Foto

मिरकरवाडा जेटी आणि तारांगण परिसरात पोलिसांचे ‘फूट पेट्रोलिंग’

रत्नागिरी (जमीर खलफे) - जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि दिलेल्या सूचनांनुसार, शुक्रवारी रात्री रत्नागिरी शहरात मिरकरवाडा जेटी आणि तारांगण परिसरात विशेष मोहीम राबवण्यात आली. शांतता आणि सुरक्षितता राखण्याच्या उद्देशाने करण्यात आलेल्या या कारवाईत दंगल नियंत्रण पथकाचे ३० अंमलदार तसेच रत्नागिरी शहर पोलीस स्टेशनचे दोन अधिकारी आणि सात कर्मचाऱ्यांनी सक्रिय सहभाग घेतला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या मोहिमेदरम्यान, पोलिसांच्या पथकाने मिरकर वाडा, जेटी आणि तारांगण परिसराची कसून तपासणी केली. फूट पेट्रोलिंग करत असताना, मिरकर वाडा येथे अंधाऱ्या जागेत एका व्यक्तीला उघड्यावर दारू पिताना रंगेहात पकडण्यात आले. सार्वजनिक ठिकाणी मद्यपान केल्याबद्दल त्या व्यक्तीवर तात्काळ महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम, १९४९ अन्वये कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.

टाइम्स स्पेशल

याव्यतिरिक्त, जेटी परिसरात संशयास्पद हालचाली करणाऱ्या व्यक्तींची चौकशी करण्यात आली. तसेच त्यांची ओळखपत्रे तपासण्यात आली, जेणेकरून कोणत्याही अनुचित प्रकाराला वाव मिळणार नाही. पोलीस दलाने केलेल्या या धडक कारवाईमुळे परिसरातील नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून, यापुढेही अशी गस्त सुरू राहणार असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg