loader
Breaking News
Breaking News
Foto

जिल्हास्तरीय थाळीफेक स्पर्धेत पोलादपूरचा यश मोरे ठरला उपविजेता

पोलादपूर (धनराज गोपाळ) - तालुक्यातील साने गुरुजी विद्यालय लोहारे या विद्यालयात शिकत असलेला यश सुभाष मोरे यांनी नुकत्याच झालेल्या पिल्लई कॉलेज एच ओ सी येथे जिल्हास्तरीय थाळीफेक स्पर्धेत नेत्रदीपक कामगिरी करत द्वितीय क्रमांक मिळवून उपविजेता ठरला असून या यशाने पोलादपूर तालुक्याचे नाव उंचावले आहे. सदर स्पर्धेत जिल्ह्यातील बहुसंख्य विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेत यश मोरे यांनी आपली मेहनत, चिकाटी, जिद्द, सातत्यपूर्ण प्रयत्नांची उत्तम कामगिरी करत उपविजेतेपद प्राप्त केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यशच्या या यशामध्ये मुख्याध्यापक माधवी देशमुख क्रीडा शिक्षक रुपेश झाडाने व ऋषिकेश शेलार, वडील सुभाष मोरे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. यश मोरे यांनी यापूर्वी सुद्धा अनेक क्रीडा स्पर्धांमध्ये नेत्रदीपक कामगिरी करत यश संपादन केले आहे. यश मोरे यांनी विद्यालयाला मिळवून दिलेल्या या यशाबद्दल शाळा समिती, शाळा व्यवस्थापन समिती, पालक शिक्षक संघ, माता-पालक संघ सर्व समित्यांचे पदाधिकारी सहयोग प्रतिष्ठानचे पदाधिकारी तसेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी यश मोरे याचे कौतुक व अभिनंदन केले असून समाजाच्या सर्व स्तरातून यशचे अभिनंदन व कौतुक केले जात आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg