loader
Breaking News
Breaking News
Foto

हर्णे बंदरात पर्यटकांची मासळी खरेदीसाठी झुंबड!

संगलट( खेड )(इक्बाल जमादार) - दिवाळीच्या सुट्टीमुळे दापोली तालुक्यातील समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांची अक्षरशः झुंबड उडाली आहे. विशेषतः हर्णे बंदरात गेल्या तीन दिवसांपासून सकाळी व संध्याकाळी पर्यटकांची विक्रमी गर्दी पाहायला मिळत आहे. शनिवारी (ता. २५) सकाळी तर बंदर जत्रेसारखे गजबजून गेले होते. पर्यटकांकडून मोठ्या प्रमाणावर मासळी खरेदी केली जात असून दररोज लाखोंची उलाढाल होत आहे. यामुळे मच्छीमार महिलांना चांगला आर्थिक फायदा मिळत असल्याचे येथील मच्छीमार सांगतात.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

हर्णे बंदर हे दापोली तालुक्यातील सर्वात मोठे मासळी केंद्र मानले जाते. येथील ‘मासळी बाजार’ पर्यटकांसाठी विशेष आकर्षण ठरत असून, ताज्या मासळीच्या लिलावात सहभागी होण्याचा अनोखा अनुभव अनेक पर्यटक घेत आहेत. कोळंबी, सुरमई, पापलेट, बांगडा, म्हाकुळ, बेबी म्हाकुळ आणि बग्गा या जातींना प्रचंड मागणी आहे. दिवाळीच्या सलग सुट्टीमुळे दाभोळ ते केळशी किनारपट्टीवरील बहुतांश हॉटेल्स व रिसॉर्ट्स फुल्ल झाले आहेत.

टाईम्स स्पेशल

‘झिंगा फ्राय’, ‘पापलेट थाळी’, ‘सुरमई थाळी’, ‘कोळंबी बिर्याणी’, ‘मच्छीफ्राय’ आणि ‘खेकड्याचा रस्सा’ या कोकणी मसालेदार पदार्थांचा मोह पर्यटकांना आवरत नाही. अनेकजण बंदरातून मासळी खरेदी करून थेट रिसॉर्टमध्ये ती तयार करून खात असल्याचेही दिसून येते. “दापोलीला आलो आणि हर्णे बंदरातली ताजी मासळी खाल्ली नाही, असं होत नाही!” असे अनेक पर्यटक सांगतात.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg