loader
Breaking News
Breaking News
Foto

रत्नागिरी जिल्हा साहित्य संमेलनाच्या निमित्ताने युवकांसाठी निबंध स्पर्धा व युवा रंग काव्य स्पर्धा

रत्नागिरी: (जमीर खलफे) - नवनिर्माण शिक्षण संस्था आणि मराठी भाषा विभाग व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरीमध्ये दिनांक २२ नोव्हेंबर रोजी रत्नागिरी जिल्हा साहित्य संमेलन होणार आहे. या साहित्य संमेलनामध्ये युवकांसाठी काव्यवाचन तसेच निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या वाचन आणि लेखन कौशल्याला चालना देण्यासाठी कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयीन गटामध्ये निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. कनिष्ठ गटामध्ये अभिजात माय मराठी व मला प्रभावित केलेले मराठी पुस्तक असे निबंधाचे विषय ठेवण्यात आले आहे. यासाठी ५०० ते ७०० शब्द मर्यादा असेल. वरिष्ठ गटामध्ये कोकण बोलीभाषांचे माहेरघर, अभिजात मराठी आणि माझी जबाबदारी हे दोन विषय ठेवण्यात आले आहेत. या गटांमध्ये ७०० ते १००० अशी शब्द मर्यादा असेल. विद्यार्थ्यांनी आपले नाव कॉलेजचे नाव, संपर्क क्रमांक नमूद करून आपला निबंध दिनांक ५ नोव्हेंबर पर्यंत प्राचार्य, एस पी हेगशेट्ये महाविद्यालय, रत्नागिरी या पत्त्यावर पाठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

अधिक माहितीसाठी प्रा. संदीप कांबळे (९४२२०५३३७२), संजय वैशंपायन (९१ ९४२२४ ३६५२१ ) व प्रा.सचिन टेकाळे (९१ ९४०३२ ५७५८१) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जिल्हा साहित्य संमेलनानिमित्त युवारंग ही काव्यवाचन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही काव्य वाचन स्पर्धा ४ विभागात होणार आहे. युवाशक्ती नवभारताची कवच-कुंडलं, समाजातील बदल/संवेदना आणि संघर्ष, ऑपरेशन सिंधूर: गाथा अभिमानाची, अभिजात भाषा मराठी: मी मराठी, मायमराठी! या विषयावर काव्य लेखन व वाचन स्पर्धा होणार आहे. उत्तर विभागाची (मंडणगड, खेड, दापोली) सोमवार दि. १० नोव्हेंबर २०२५ रोजी वराडकर बेलोसे कॉलेज, दापोली येथे होईल. मंगळवार दि. ११ नोव्हेंबर २०२५ रोजी पश्चिम विभागाची (गुहागर, चिपळूण) डी. बी. जे. कॉलेज, चिपळूण येथे स्पर्धा होईल. दक्षिण विभागाची (लांजा, राजापूर) : ओणी हायस्कूल, राजापूर येथे बुधवार दि. १२ नोव्हेंबर २०२५ स्पर्धा होईल. मातृ विभाग : (रत्नागिरी, संगमेश्वर) नवनिर्माण महाविद्यालय, रत्नागिरी येथे गुरुवार दि. १३ नोव्हेंबर २०२५ येथे स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेत जिल्ह्यातील सर्व नवोदित कवी (वय मर्यादा १६ ते ३५ वर्षे) सहभागी होऊ शकतील.

टाईम्स स्पेशल

स्वरचित कविता असावी. कविता मराठी भाषेतच असावी. सादरीकरणासाठी ३ मिनीटांचा वेळ दिला जाईल. कवितेची सुवाच्य अक्षरात लिहिलेली/टंकलिखित एक मूळ प्रत आयोजक व परिक्षकांना स्पर्धेआधी दयावी लागेल. परिक्षकांचा निर्णय अंतिम राहील. ही स्पर्धा चार विभागांत घेतली जाईल. सर्व सहभागी कवींना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. प्रत्येक विभागातील ४ विजेत्यांना (एकूण १६ कवी) रत्नागिरी जिल्हा साहित्य संमेलन २०२५ मध्ये युवा काव्य संमेलनात कविता सादरीकरणासाठी संधी देण्यात येईल. जिल्हा साहित्य संमेलनात मान्यवरांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना आकर्षक सन्मानचिन्ह व प्रमाणपत्रसन्मान करण्यात येईल. प्रवेशासाठी अंतिम तारीख ऑक्टोबर पर्यंत आहे. या संदर्भात कवी अरुण मोर्ये (९१७५५२६६६०/८८०५७०४५५७) यांच्याकडे संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg