loader
Breaking News
Breaking News
Foto

शिवकालीन वैभवाचा झळाळता नमुना ; मळगावात साकारला किल्ले रायगड

मळगाव (वार्ताहर) - दिवाळीच्या उत्साहात मळगाव गावात ऐतिहासिक छटा उजळून निघाली आहे. गावातील महाविद्यालयीन युवक कु. अर्जुन विजय गावकर याने आपल्या घराच्या अंगणात किल्ले रायगडाची आकर्षक प्रतिकृती साकारून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. मराठमोळ्या परंपरेचा आणि शिवकालीन वैभवाचा वारसा जपत अर्जुन उर्फ यशने अत्यंत बारकाईने हा किल्ला उभारला आहे. भव्य दरवाजे, तटबंदी, राजवाडा, तोफखाना आणि दीपमाळेच्या उजेडात झळकणारा हा किल्ला पाहणाऱ्यांना शिवकाळाचा अभिमान अनुभवास देतो.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या किल्ल्याचे दर्शन घेण्यासाठी मळगावसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने भेट देत आहेत. दिवाळीच्या वातावरणात या उपक्रमामुळे गावात संस्कृती, कला आणि देशभक्तीचा संगम पाहायला मिळतो आहे. कु. अर्जुन गावकर दरवर्षी दिवाळीत वेगवेगळ्या किल्ल्यांच्या प्रतिकृती तयार करतो. त्याच्या या कलाकृतींना विविध स्पर्धांमध्ये प्रथम क्रमांक मिळालेला असून, गावकऱ्यांकडून त्याच्या कलेचे भरभरून कौतुक होत आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg