loader
Breaking News
Breaking News
Foto

स्थानिक स्वराज्य निवडणुकीसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरला; मुंबईत एकत्र, तर इतर ठिकाणी स्वबळावर लढणार

मुंबई: राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजप, शिवसेना (एकनाथ शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या तिन्ही पक्षांनी एक महत्त्वाचा फॉर्म्युला ठरवला आहे. या फॉर्म्युल्यानुसार, महायुती (Mahayuti) मुंबई महानगरपालिका आणि काही मोजक्या ठिकाणी एकत्र येऊन निवडणूक लढवणार आहे. मात्र, उर्वरित महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपरिषद आणि नगरपंचायतींमध्ये हे तिन्ही पक्ष स्वबळावर लढणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मुंबई महानगरपालिका निवडणुकीत महायुतीचे तिन्ही घटकपक्ष भाजप, शिंदे गटाची शिवसेना आणि अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्रितरित्या लढतील. मुंबईसारख्या उच्च प्रतीकात्मक आणि प्रतिष्ठेच्या निवडणुकीत एकजुट दाखवणे आवश्यक असल्याचे महायुतीचे मत आहे.

टाइम्स स्पेशल

दुसरीकडे, पुणे, ठाणे, नाशिक, नागपूर, छत्रपती संभाजीनगरसह इतर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये हे पक्ष आपापल्या ताकदीवर उमेदवार उभे करणार आहेत. निवडणूक निकालानंतर पुन्हा एकत्र येऊन सत्तास्थापनेसाठी आघाडी करण्याचा निर्णय महायुतीने घेतला आहे

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg

जिल्हा परिषद, नगरपरिषद आणि नगरपंचायतींमध्ये हे तिन्ही पक्ष स्वबळावर लढणार

foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg