loader
Breaking News
Breaking News
Foto

वैभववाडीत "ज्ञानोबा माऊली... तुकाराम!" चा जयघोष

वैभववाडी (प्रतिनिधी) : "ज्ञानोबा माऊली... तुकाराम!" या जयघोषाने वैभववाडी शहर भक्तिरसाने न्हाऊन निघाले, कारण एकात्मता वारकरी संप्रदाय आयोजित कोकण दिंडी वैभववाडीत दाखल झाली. देवगड–बापार्डे, वैभववाडी ते श्री क्षेत्र पंढरपूर या कार्तिकी पायी वारीचे औचित्य साधत सायंकाळी दिंडीचे वैभववाडीत आगमन झाले. येथील संभाजी चौकात पार पडलेल्या रिंगण सोहळ्यात सहभागी झालेला अश्व सर्वांचेच आकर्षण ठरला. टाळ-मृदुंगाच्या निनादात आणि संत नामस्मरणाच्या गजरात परिसर भक्तिमय झाला होता.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या प्रसंगी सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदायाचे अध्यक्ष हभप विश्वनाथ महाराज गवंढळकर, कार्याध्यक्ष हभप संतोष राऊळ, खजिनदार हभप मधुकर प्रभूगावकर, सचिव गणपत घाडीगावकर, तसेच सदस्य प्रकाश सावंत व राजेश पडवळ यांनी उपस्थित राहून दिंडीचे स्वागत केले. कोकण दिंडीत सहभागी सर्व वारकऱ्यांना हभप गवंढळकर महाराज यांनी शुभेच्छा दिल्या.

टाइम्स स्पेशल

या दिंडीत एकात्मता वारकरी संप्रदायाचे अध्यक्ष हभप गणेश गिरकर, उपाध्यक्ष रवींद्र पाटकर, सचिव अनिल पाळेकर, सहसचिव राजेश पडवळ, संजय नाईकधुरे, संजय गुरव, प्रकाश सुतार यांच्यासह अनेक वारकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कोकण दिंडीची ही पायी वारी भक्ती, एकात्मता आणि संत परंपरेचा अखंड वारसा जपत पंढरपूरच्या दिशेने पुढे निघाली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg