loader
Breaking News
Breaking News
Foto

म्हसळा शिवसेना उबाठा पक्ष तालुका प्रमुख पदी तुकाराम चाळके तर शहरप्रमुख पदी अभय कळमकर

म्हसळा (वार्ताहर) - आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी केली आहे. शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाने ही भाकरी फिरवत रायगड जिल्ह्यात नवीन नियुक्त्या केल्या आहेत. त्या अनुषंगाने कट्टर शिवसैनिक काळसुरी येथील रहिवाशी तुकाराम चाळके यांची तालुका प्रमुख पदी तर अभय कळमकर यांची शहरप्रमुखपदी नियुक्ती केली आहे.तर अन्य निवडीत तालुका संपर्कप्रमुख पदी विश्वनाथ विचारे, तालुका समन्वयक पदी अशोक पाटील, उपतालुका प्रमुख पदी रोशन पारावे, महिला तालुका संघटक पदी निशा पाटील, उपतालुका संघटक पदी दीपाली कांबळे तर विभाग संघटक पदी रेणुका मोरे यांची नियुक्ती केली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

शिवसेनेला तालुक्यात गतवैभव प्राप्त करून, तालुक्यात पुन्हा शिवसेना ऊध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाला एक नंबर चा पक्ष करण्यासाठी सर्व कट्टर शिवसैनिक एकत्र आणणार असल्याचे नवनियुक्त तालुका प्रमुख तुकाराम चाळके आणी शहरप्रमुख अभय कळमकर यांनी सांगितले आहे. दक्षिण रायगड जिल्हा प्रमुख नंदू शिर्के, महिला जिल्हा संघटक स्वीटी गिरासे, नवनियुक्त उपजिल्हाप्रमुख अतुल चौगले, संपर्क प्रमुख दिलीप करंदीकर, राजेंद्र सावंत, अनंत कांबळे, शौकत हजवाने यांनी नवनियुक्त पदाधिकार्‍यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg