loader
Breaking News
Breaking News
Foto

महाराष्ट्रात पुन्हा मुसळधार पाऊस! मुंबई, पुण्यासह 24 जिल्ह्यात अलर्ट जारी ; उद्या पण पाऊस

राज्यात पुन्हा एकदा पावसाचा मुक्काम वाढण्याची शक्यता हवामान विभागाने (IMD) वर्तवली आहे. पुढील चार दिवस वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे. अनेक जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी केला आहे.गेल्या आठवडाभरापासून विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि कोकणात मुसळधार पाऊस झाला आहे. या पावसामुळे कांदा, सोयाबीन, कापूस, मका, टोमॅटो आणि भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

हवामान विभागाच्या माहितीनुसार, अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय असल्याने पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. हवामान विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि ग्रामीण भागात शेतीसंबंधी खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.कोल्हापूर, कोल्हापूर घाट, सातारा, सातारा घाट, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यात मुसळधार पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg