loader
Breaking News
Breaking News
Foto

सावंतवाडीकरांना दिवाळीपर्यंत भाजपच्या माध्यमातून सुसज्ज रुग्णालयाची भेट!

सावंतवाडी (प्रतिनिधी) - सावंतवाडी शहरासाठी आरोग्य क्षेत्रातील एक मोठी आणि महत्त्वपूर्ण घोषणा भाजपचे युवा नेते विशाल परब यांनी केली आहे. पुढील दिवाळीपर्यंत सावंतवाडीकरांना अत्याधुनिक आरोग्य सेवा देणारे सुसज्ज रुग्णालय भाजपच्या माध्यमातून सुरू करण्यात येणार आहे, अशी घोषणा त्यांनी ’अभंग रिपोस्ट’ या कार्यक्रमादरम्यान केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण, माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे यांच्यासह सर्व मान्यवरांच्या मार्गदर्शनाखाली हे रुग्णालय उभे राहणार असून, तेथे दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध असेल, असे विशाल परब यांनी सांगितले. आरोग्यसेवेसाठी आता दूर जावे लागणार नाही! ‘आरोग्य हा प्रत्येकाचा हक्क आहे आणि सावंतवाडीकरांना दर्जेदार आरोग्यसेवा मिळालीच पाहिजे’ या भावनेतून विशाल परब यांनी ही घोषणा केली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

गंभीर आजारांवर उपचारासाठी सावंतवाडी शहर आणि परिसरातील नागरिकांना आजही कोल्हापूर, गोवा किंवा थेट मुंबई गाठावी लागते. रुग्णवाहिकेतील तासन्‌तासांचा प्रवास, रुग्णांच्या नातेवाइकांचा संघर्ष आणि आरोग्य यंत्रणेतील तुटवडा ही सावंतवाडीकरांची आजवरची मोठी समस्या आहे.ङ्गङ्घयाच पार्श्वभूमीवर बोलताना विशाल परब यांनी स्पष्ट केले, सावंतवाडीतील नागरिकांना उपचारासाठी दूर जावं लागू नये, म्हणूनच आम्ही भाजपच्या माध्यमातून एक अत्याधुनिक हॉस्पिटल सेवा देणार आहोत. ही दिवाळी सावंतवाडीकरांसाठी आरोग्यदायी दिवाळी ठरेल, असा माझा संकल्प आहे.

टाइम्स स्पेशल

परब यांच्या या घोषणेचे ’अभंग रिपोस्ट’ या संगीत कार्यक्रमादरम्यान उपस्थित नागरिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत केले. ही घोषणा अनेकांसाठी आशेची नवी पहाट ठरली, तर काहींच्या डोळ्यांत आशेचे अश्रूही दाटले. यावेळी भाजप महिला अध्यक्षा श्वेता कोरगावकर, मंडळ अध्यक्ष सुधीर आडिवरेकर, सामाजिक कार्यकर्त्या वेदिका परब आणि अँड अनिल निरवडेकर यांनीही या उपक्रमाचे कौतुक केले. श्वेता कोरगावकर यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले, आज विशाल परब यांनी केवळ घोषणा केली नाही, तर सावंतवाडीकरांसाठी आशेचा दिवा पेटवला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg