loader
Breaking News
Breaking News
Foto

मुंबईसह कोंकणात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस ;उकाड्यापासून दिलासा, शेतकरी रडतोय

मुंबई. राज्यात पावसाने हाहाकार उडावला होता. यानंतर आता पुन्हा शेतकऱ्यांची चिंता वाढवली आहे. राज्यात आज अनेक ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. मुंबई, रायगड, कोल्हापूर या ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळत आहे.मुंबई शहराच्या पश्चिम उपनगरांमध्ये पावसाच्या सरी कोसळत आहेत, तर मालाड पश्चिम सारख्या भागात सतत पाऊस पडत आहे. प्रवाशांना संथ वाहतुकीचा सामना करावा लागला, तर रस्ते आणि सार्वजनिक ठिकाणी पाणी साचले आहे. ज्यामुळे सततच्या उष्णतेपासून दिलासा मिळाला.कोकणात भात कापणीला आले असता पाऊस पडत असल्याने शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. भात पीक कापून शेतातच ठेवण्यात आले आहे. झो डणी कामही काही ठिकाणी सुरू आहे. विशेषता वलाट पट्ट्यातील शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान झाले आहे. मळे शेतीचे हे नुकसान झाले आहे.रायगड जिल्ह्यात शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. कापलेले पीक पावसात भिजल्याने शेतकरी ढसाढसा रडत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

शहरातील नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. मात्र, अनेक ठिकाणी पिकांची काढणी सुरु असल्याने शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.राज्यात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. काल राज्यात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. आता आज पुन्हा मुंबईसह अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg