loader
Breaking News
Breaking News
Foto

फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्येप्रकरणी चिपळूण शिवसेना (उबाठा) महिला आघाडीतर्फे चौकशीची मागणी

वेळणेश्वर (उमेश शिंदे) - फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला वैद्यकीय अधिकारी डॉ. संपदा मुंडे यांच्या आत्महत्येप्रकरणी वरिष्ठ अधिकार्‍यांचा कथित सहभाग आणि राजकीय दबावामुळे आरोपींना मिळत असलेल्या संरक्षणाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) चिपळूण महिला आघाडीने राज्य सरकारकडे उच्चस्तरीय व निष्पक्ष चौकशीची तातडीची मागणी केली आहे. मृत्यूपूर्वी स्वत:च्या हातावर लिहून ठेवलेल्या मजकुरानुसार पोलीस निरीक्षक गोपाल बदने यांनी त्यांच्यावर बलात्कार केला, तसेच प्रशांत बनकर आणि इतरांनी सतत छळ केला असल्याचे गंभीर आरोप आहेत. याशिवाय, तक्रार करूनही तत्कालीन पोलीस अधीक्षक अनिल महाडीक आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांनी जाणूनबुजून दुर्लक्ष केल्याचे दस्तऐवज उपलब्ध असल्याचे सांगण्यात येत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

याप्रकरणी सत्ताधारी पक्षाशी संबंधित माजी खासदार रणजीत नाईक निंबाळकर आणि त्यांचे स्वीय सहाय्यक राजेंद्र शिंदे तसेच रोहित नागतिळे हे आरोपींना संरक्षण देत असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. डॉ. मुंडे यांच्यावर शवविच्छेदनांमध्ये पक्षपाती प्रमाणपत्रे देण्याचा दबाव आणला जात होता. वैद्यकीय नैतिकतेला प्राधान्य दिल्याने त्यांच्या छळात भर पडली. पोलिसांनी तक्रारीकडे दुर्लक्ष करणे, मृतदेहाच्या शवविच्छेदनात विलंब, प्राथमिक चौकशीतील गंभीर त्रुटी यामुळे न्यायव्यवस्थेवरील विश्वास डळमळीत होत असल्याची टीका करण्यात आली.या संदर्भात निष्पक्ष, स्वतंत्र आणि वेळेत पूर्ण होणार्‍या तपासाशिवाय पर्याय नसल्याचे शिवसेना महिला आघाडीने स्पष्ट केले. दोषींवर कठोर कारवाई करण्याची तसेच महिला अधिकारी व कर्मचार्‍यांच्या सुरक्षिततेसाठी तत्काळ उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली.

टाईम्स स्पेशल

चिपळूण संगमेश्वर विधानसभा क्षेत्र संघटिका रुमा देवळेकर, तालुका संघटिका मानसी भोसले यांच्या नेतृत्वाखाली चिपळूण उपविभागीय पोलीस अधिकारी प्रकाश बेले यांना निवेदन देण्यात आले. यावेळी महिला आघाडीचे एक मोठे प्रतिनिधीमंडळ उपस्थित होते. याप्रसंगी चिपळूण संगमेश्वर विधानसभा क्षेत्र प्रमुख महादेव (बाळा) कदम, तालुका प्रमुख बळीराम गुजर, उपतालुकाप्रमुख सचिन शेट्ये, उपशहरप्रमुख संतोष पवार, विभागप्रमुख अजित गुजर, मनोज पांचाळ, चिपळूण तालुका प्रसिद्धीप्रमुख सचिन चोरगे, चिपळूण शहर संघटिका वैशाली शिंदे, उपतालुका संघटिका दीप्ती सावंत देसाई, युवती अधिकारी तीर्था लाड, शाखाप्रमुख माधवी दिवटे, शाखा संघटिका निखी साळुंखे, उपशाखा संघटिका सुहासिनी मुकादम, वैशाली मानकर, अनिता पिसे, विद्या महाडिक, सुनिल सावंत-देसाई तसेच चिपळूण महिला आघाडीच्या कार्यकर्त्या उपस्थित होत्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg