loader
Breaking News
Breaking News
Foto

पुण्यश्लोक राजमाता महाराणी अहिल्यादेवी होळकर समाज भवनाचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते उद्घाटन

वैभववाडी (प्रतिनिधी) - पुण्यश्लोक राजमाता महाराणी अहिल्यादेवी होळकर समाज भवन उद्घाटन वायबोशी येथे आलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तथा मत्स्य व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांचे धनगर समाजाच्या पारंपरिक गजनूत्य सादर करत भव्य दिव्य असे स्वागत करत समाज भवनापर्यंत ढोल थाळ्याच्या गजरात रॅली काढण्यात आली. यानंतर पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते भव्य दिव्य अशा समाजभवनाचे उद्घाटन करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद रावराणे, भाजपा तालुका अध्यक्ष सुधीर नकाशे, वैभववाडी नगराध्यक्षा श्रद्धा रावराणे, गटविकास अधिकारी आर.डी. जंगले, कृषी विस्तार अधिकारी प्रकाश आडुळकर, माजी वित्त बांधकाम सभापती जयेंद्र रावराणे, उपसरपंच प्रज्ञा रावराणे, माजी उपसरपंच शेळके, धनगर समाज अध्यक्ष गंगाराम आडुळकर, नवलराज काळे आदि तालुक्यातील धनगर समाज बांधव भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या समाजभावनासाठी विनामूल्य जमीन देणार्‍या वायबोशी गावचे पांडुरंग शेळके व माजी उपसरपंच शेळके यांचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg