loader
Breaking News
Breaking News
Foto

मालवणात शिवसेनेच्या बैठकीत महाविजयाचा संकल्प

मालवण (प्रतिनिधी) - आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने मालवणमध्ये संघटनात्मक मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत येथील दैवज्ञ भवन सभागृहात शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. यावेळी पक्षाची निवडणूक रणनीती निश्चित करून संघटन मजबूत करत "महाविजया" चा निर्धार करण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या बैठकीत आमदार निलेश राणे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. पक्षाची निवडणूक रणनीती, संघटनाची बळकटी आणि कार्यकर्त्यांची भूमिका यावर सविस्तर चर्चा झाली. शिवसेना नेहमीप्रमाणे हिंदुत्व, विकास आणि जनसेवा या तत्त्वांवर ठाम राहून जनतेचा विश्वास जिंकत मोठ्या विजयाचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. बुथ पातळीवर काम करण्याची आणि सामान्य माणसांपर्यंत पोहोचण्याची गरज असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

टाइम्स स्पेशल

या बैठकीला जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, माजी आमदार राजन तेली, जिल्हा समन्वयक महेश कांदळगावकर, मच्छिमार आघाडी जिल्हाप्रमुख राजा गावकर, महिला जिल्हाप्रमुख दीपलक्ष्मी पडते, संजय पडते, शहरप्रमुख दीपक पाटकर, तालुकाप्रमुख विनायक बाईत, उपजिल्हाप्रमुख विश्वास गावकर, विधानसभा प्रमुख बबन शिंदे, युवासेना जिल्हाप्रमुख संग्राम साळसकर, युवती सेना जिल्हाप्रमुख सोनाली पाटकर यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी एकजुटीने काम करत आगामी निवडणुकीत शिवसेनेला मोठे यश मिळवून देण्याचा संकल्प केला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg