loader
Breaking News
Breaking News
Foto

साऊथ आफ्रिकेत होणाऱ्या इंडियन नेव्ही च्या आंतरराष्ट्रीय शिबिरासाठी देशातील सर्वोत्कृष्ट कॅडेट म्हणून मयुराज टक्के याची निवड

देवळे (प्रकाश चाळके ) इंडियन नेव्ही तर्फे आयोजित प्रतिष्ठित OSD – Overseas Deployment या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या ऑपरेशनल एक्सरसाईज शिबिरासाठी CC मयुराज टक्के यांची निवड झाली आहे. मयुराज टक्के हा संगमेश्वर तालुक्यातील देवरुख नजीकच्या ओझरे खुर्द तळवडे येथे राहतो. मयुराज चे वडील भरत टक्के हे सेंटरिंगचे काम करतात. त्याचे आजोबा विष्णू टक्के हे ओझरे खुर्द माजी सरपंच होते ग्रुप ग्रामपंचायत. या आंतरराष्ट्रीय कॅम्पसाठी केनिया, साऊथ आफ्रिका, मोझाम्बिक आणि टांझानिया या देशांमध्ये भारतीय नौदलाच्या सहभागाने विविध नौदल सराव, प्रशिक्षण आणि सांस्कृतिक देवाणघेवाण कार्यक्रम पार पडत आहेत. देशभरातील सर्वोत्कृष्ट NCC कॅडेट्समधून निवड होऊन CC मयुराज टक्के महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत, ही संपूर्ण जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

OSD हा भारतीय नौदलाचा एक प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय कार्यक्रम असून, या अंतर्गत निवडक NCC कॅडेट्सना भारतीय नौदलाच्या जहाजावर प्रत्यक्ष प्रशिक्षण आणि परदेशी नौदलांशी अनुभव देवाणघेवाण करण्याची संधी मिळते. या आधी मयुराज ऑल इंडिया नोसैनिक व national rifle shooting compitation मध्ये महाराष्ट्र राज्याचे नेतृत्व केले होते.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg